Parbhani News : महाबीजच्या परभणी विभाग अंतर्गतच्या परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या ६ जिल्ह्यांमध्ये यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात ७ हजार ७१० नोंदणीकृत शेतकऱ्यांनी १५ हजार ३३ हेक्टरवर विविध पिकांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेतला आहे.
गतवर्षीच्या (२०२२) तुलनेत यंदा बीजोत्पादन क्षेत्रात १ हजार ४५१ हेक्टरने वाढ झाली आहे. यंदा विभागात बीजोत्पादनाचे २० हजार २१४ हेक्टर उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात १५ हजार ३३ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जात आहे. पावसाच्या खंडामुळे बियाणे उत्पादनात घट अपेक्षित आहे.
‘महाबीज’च्या परभणी विभागात दरवर्षी खरिपात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी आदी पिकांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येतो. सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक असते. गतवर्षी (२०२२) मध्ये लक्ष्यांक २२ हजार ५०० हेक्टर उद्दिष्ट असताना १३ हजार ५८२ हेक्टरवर बीजोत्पादन होते.
यंदा २० हजार २१४ हेक्टर उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात १५ हजार ३२ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम आहे. उद्दिष्टापेक्षा ५ हजार १८१ हेक्टरने घट झाली आहे. परंतु गतवर्षीच्या तुलनेत १ हजार ४५१ हेक्टरने वाढ झाली आहे.
यंदा विभागात सोयाबीनचा १९ हजार ३८९ पैकी १४ हजार ५१४ हेक्टरवर (७३९५ शेतकरी) बीजोत्पादन कार्यक्रम आहे. तुरीचा १२६ पैकी १४३ हेक्टर (९३ शेतकरी), मूग १४० पैकी १०३ हेक्टर (६६ शेतकरी), उडीद २६६ पैकी १७१ हेक्टर (११० शेतकरी) व इतर पिकांचा २९३ पैकी १०० हेक्टरवर (४६) शेतकरी बीजोत्पादन कार्यक्रम आहे.
यंदाच्या एकूण बीजोत्पादनामध्ये परभणी जिल्ह्यात २ हजार ३७० शेतकऱ्यांनी ४ हजार ४८८ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यात १ हजार ५१५ शेतकऱ्यांनी ३ हजार ४७० हेक्टरवर बीजोत्पादन घेतले आहे.
नांदेड जिल्ह्यात ६२० शेतकऱ्यांनी १ हजार १२० हेक्टरवर, लातूर जिल्ह्यातील १ हजार ७७० शेतकऱ्यांनी ३ हजार २२७ हेक्टर, धाराशिव जिल्ह्यातील १ हजार १८६ शेतकऱ्यांनी २ हजार ९८ हेक्टरवर, सोलापूर जिल्ह्यातील २४९ शेतकऱ्यांनी ५३० हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम घेतला आहे.
परभणी विभाग तुलनात्मक बीजोत्पादन क्षेत्र (हेक्टरमध्ये)
वर्षे...क्षेत्र
२०२१...२०१३०
२०२२...१३५४८
२०२३...१५०३३
परभणी विभाग २०२३ खरीप बीजोत्पादन क्षेत्र स्थिती (हेक्टरमध्ये)
जिल्हा...सोयाबीन...तूर...मूग..उडीद...इतर...एकूण
परभणी...४३०१...४१...८९...८...४९...४४८८
हिंगोली...३४६९...००...००..१...००...३४७०
नांदेड...११९२...००...००...१८...१०...१२२०
लातूर...३०७३...५८...१४...५०...३२...३२२७
धाराशिव...१९९५...२४...००...६९...१०...२०९८
सोलापूर...४८४...२०...००..२६...००...५३०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.