Seed Production : बीजोत्पादन, पूरक, प्रक्रियेतील तंत्रज्ञान प्रसार बोरगाव कृषी विज्ञान केंद्रातील प्रयोग

Processing Technology : बोरगाव (ता. सातारा) येथे कार्यरत कृषी विज्ञान केंद्राचे (केव्हीके) सहा तालुक्यांत कार्यक्षेत्र पसरले आहे. त्याद्वारे विविध पिकांचे बीजोत्पादन, सुधारित वाण प्रसार, रोपेनिर्मिती, विविध पूरक उद्योग, प्रक्रिया, यंत्रे, सेंद्रिय शेती आदींमधील ज्ञान- तंत्रज्ञान प्रसार व प्रशिक्षण सुविधा येथे आहे.
Seed Production
Seed ProductionAgrowon
Published on
Updated on

विकास जाधव

KVK, Borgaon : बोरगाव (ता. सातारा) येथे कार्यरत कृषी विज्ञान केंद्राचे (केव्हीके) सहा तालुक्यांत कार्यक्षेत्र पसरले आहे. त्याद्वारे विविध पिकांचे बीजोत्पादन, सुधारित वाण प्रसार, रोपेनिर्मिती, विविध पूरक उद्योग, प्रक्रिया, यंत्रे, सेंद्रिय शेती आदींमधील ज्ञान- तंत्रज्ञान प्रसार व प्रशिक्षण सुविधा येथे आहे. त्याद्वारे शेती प्रगती व शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत बोरगाव (ता. जि. सातारा) येथे कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) कार्यरत आहे. सन २०१० मध्ये त्याची स्थापना झाली. केव्हीकेच्या कार्यक्षेत्रात जिल्ह्यातील महाबळेश्‍वर, वाई, खंडाळा, फलटण, जावळी व सातारा हे सहा तालुके येतात. अतिपर्जन्यमान ते पर्जन्यछाया प्रदेश, पर्वतीय, उपपर्वतीय व मैदानी प्रदेश असे संमिश्र हवामान व भौगोलिक क्षेत्र लाभलेले हे केव्हीके आहे. चोवीस शेतकऱ्यांसाठी निवासी प्रशिक्षण व्यवस्था आहे.

केंद्रातील विविध प्रयोग

पीक पद्धती

-रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन दहा ते १२ हेक्टर तर हरभरा दोन ते तीन हेक्टर असा बीजोत्पादन कार्यक्रम २०१४ पासून सुरू. त्यातून तयार झालेल्या पायाभूत, सत्यतादर्शक बियाण्यांची विक्री शेतकरी गटांना केली जाते. यात सुधारित किंवा नव्या वाणांचा समावेश.

-कृषी विद्यापीठ व पुणे येथील फुले संशोधन केंद्राकडील निशिगंधाच्या वाणांचे प्रयोग प्रक्षेत्रावर राबविण्यात येत आहेत. यात डबल (बुकेसाठी) चार व सिंगल (हारांसाठी) तीन वाण
आहेत. तयार कंदांची विक्री सहा रुपये प्रति नग याप्रमाणे. शेतकरी गटांनाही लागवडीसाठी प्रोत्साहन.
-पीक संग्रहालयात कृषी विद्यापीठांकडील नावीन्यपूर्ण वाणांची लागवड. हळदीच्या विविध राज्यांतील वाणांचे प्रयोग. यात कुरकुमीनचे अधिक प्रमाण असलेल्या वाणांचा समावेश.
-पेरू व आंबा यांची सघन पद्धतीने लागवड. रोपवाटिकेत केसर आंबा व पेरूच्या सरदार वाणांची कलमी रोपे उपलब्ध आहेत. तर बियांपासून तयार केलेली आवळा, शेवगा, लिंबाची (साई व फुले सरबती) रोपे उपलब्ध.

Seed Production
Millets : कृषी विज्ञान केंद्र करणार भरडधान्यांचा प्रचार, प्रसार

- विविध फळपिकांच्या कलमांची अभिवृद्धी वेगवेगळ्या महिन्यात करून त्यांची यशस्वी होण्याची टक्केवारी पॉली टनेलमध्ये तपासली जाते.
-कमी कालावधीतील परदेशी भाजीपाला लागवडीतून शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी
प्रत्येकी १० गुंठ्यांत पाच प्रकार. मधुमक्षिकापालन युनिट.
-सौरऊर्जेवर आधारित स्वयंचलित जिवामृत युनिट. प्रक्षेत्रावरील पिकांसाठी त्याचा वापर करून जमिनीची सुपीकता, उत्पादन व दर्जा यात सुधारणा होण्यासाठी प्रयोग.

Seed Production
Seed Production : साडेबाराशे एकरांवर पैदासकार बीजोत्पादन

पूरक व्यवसाय, चारा पिके

-कावेरी, ग्रामप्रिया आदी कोंबड्यांच्या सुधारित वाणांची पिल्ले तयार करण्यासाठी अंडी उबवणी केंद्र. तीनशे अंडी उबवणी अशी क्षमता. एक दिवसाच्या पिलांची २१ रुपये याप्रमाणे विक्री.

-रेशीम कीटक संगोपन शेड, त्याविषयी शेतीशाळा. प्रशिक्षणे. तुती लागवड प्रात्यक्षिके.
-वर्षभर हिरवा चारा उपलब्धता व्हावा यासाठी सीओएफएस- २९ या वाणाच्या प्रक्षेत्रावर तसेच शेतकऱ्यांकडे चाचण्या. पेरल्यानंतर तीन वर्षे उत्पादन घेता येते. वर्षातून चार वेळा कापणी करता येते. केवळ एकदल चाऱ्यावर अवलंबून न बसता शेतकऱ्यांनी द्विदल चाऱ्यांचीही लागवड करावी यासाठी दशरथ व स्टायलो या चारा पिकांचे प्रयोग.
-कोंबड्यांच्या खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी अझोला निर्मिती. शेतकऱ्यांना असे युनिट सुरू करण्यासाठी कल्चर वितरित करण्यात येते.
-प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मिती सुविधा. मिलेटवर्गीय धान्यांना उत्तेजन. ज्वारीच्या फुले रोहिणीसारख्या वाणापासून पापड निर्मिती, नाचणी, राजगिरा बिस्किटे आदींची निर्मिती. इलेक्ट्कि ड्रायर, ओव्हन आदींची सुविधा.


काही प्रयोगांविषयी

- आले, हळद कंदकुज व्यवस्थापनात एकात्मिक व ‘फर्टिगेशन’ तंत्रज्ञान वापरून पीक उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न
-घेवड्याच्या वरुण वाणाचे भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी कृषी विभागाला सहकार्य
-केसर आंब्याला नियमित व लवकर फळधारणा होण्यासाठी संजीवकांचा वापर.
-समूह प्रात्यक्षिकांद्वारे भुईमूग, सोयाबीन, करडई, हरभरा पिकात एकात्मिक कीड- रोग तसेच अन्नद्रव्य -कृषी निविष्ठाधारकांची यादी संकलित करून डायरीचे प्रकाशन
-डीडी सह्याद्री या दूरदर्शनवाहिनीद्वारे सुमारे ५५ यशोगाथांचे प्रसारण.
-जनावरांमध्ये संसर्गजन्य रोगाचा प्रसार कमी करण्यासाठी वर्षातून तीन ते चार आरोग्य व लसीकरण.
-पशुधन तसेच रोपवाटिका व्यवस्थापन याविषयी कौशल्य आधारित प्रशिक्षणे आयोजित करून उद्योजक तयार केले.
-सातारा, कराड, पाटण तालुक्यांतील १०० हेक्टर क्षेत्रावर २७६ शेतकऱ्यांकडे भाताच्या फुले समृद्धी वाणाचे अद्ययावत लागवड तंत्रज्ञान प्रसारित. मौजे शिंदेवाडी येथे १५० एकरांवर ज्वारीचे फुले सुचित्रा वाण, लावंघर येथे १० हेक्टरवर भाताचे फुले समृद्धी, चिंचणेर निंब येथे २० हेक्टरवर सोयाबीनचे
फुले संगम, फुले किमया, फुले दूर्वा, तर भुईमुगाच्या फुले चैतन्य आदी वाणांचे बीजोत्पादन.
जिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांनाही बियाणे उपलब्ध केले.
-चिंचणेर निंब या दत्तक गावात १०० हेक्टरवर ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम यशस्वी.

डॉ. महेश बाबर, ९८५०६८७२५३
(कार्यक्रम समन्वयक)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com