Seed Production : साडेबाराशे एकरांवर पैदासकार बीजोत्पादन

VNMKV Parbhani : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने खरीप हंगामात दुप्पट बीजोत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्रावरील अनेक वर्षांपासून पडीक असलेली १ हजार २५० एकर जमीन लागवडीखाली आणली आहे.
Seed Production
Seed ProductionAgrowon

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने खरीप हंगामात दुप्पट बीजोत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्रावरील अनेक वर्षांपासून पडीक असलेली १ हजार २५० एकर जमीन लागवडीखाली आणली आहे. गुरुवारी (ता. ६) कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांच्या हस्ते या जमिनीवर पेरणीस सुरुवात करण्यात आली.

या वेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, सहयोगी संचालक बियाणे डॉ. के. एस. बेग, मध्‍यवर्ती प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विलास खर्गखराटे आदी उपस्थित होते. कृषी विद्यापीठाच्या स्‍थापनेपासून १९७२ ते २००१ या कालावधीत परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्रावर (सेंट्रल फार्म) विविध पिकांच्‍या वाणांचे पायाभूत, पैदासकार, प्रमाणित आणि सत्‍यतादर्शक बीजोत्‍पादन घेतले जात होते.

Seed Production
Seed Production : आदिवासी भागात होणार नागली, वरईच्या सुधारित वाणांचे बीजोत्पादन

परंतु गेल्‍या काही वर्षांपासून निधी व मनुष्‍यबळ अभावी यातील बहुतांश क्षेत्र लागवडीखाली आणण्‍यात अडचणी निर्माण झाल्‍यामुळे जमीन पडीक झाली होती. यंदा कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी विद्यापीठाचे बीजोत्‍पादन दुप्‍पट करण्‍याच्‍या उद्देशाने मध्‍यवर्ती प्रक्षेत्र विकासाकडे विशेष लक्ष दिले. या वर्षी उन्हाळ्यात पडीक क्षेत्रावरील काटेरी झाडेझुडपे काढून जमिनीची नांगरणी, मोगडणी आदी मशागतीची कामे, तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदण्यात आले.

Seed Production
Seed Production : ‘महाबीज’कडून सोयाबीन, उडदासाठी बीजोत्पादन

त्यासाठी विद्यापीठातील विविध प्रकल्‍प व योजनांतील ट्रॅक्‍टर्स तसेच इतर यंत्रसामग्रीचा वापर करण्‍यात आला. सुमारे १ हजार २५० एकर जमीन क्षेत्र या खरीप हंगामात पैदासकार बीजोत्‍पादनाकरिता तयार झाले आहे. प्रक्षेत्रावर नवीन चार मोठ्या क्षमतेची शेततळी निर्माण करण्‍यात आली असून, जुन्या मोठ्या शेततळ्याची दुरुस्ती करण्‍यात आली आहे. या माध्यमातून ८ ते ९ कोटी लिटर पाणीसाठा निर्माण होणार आहे.

बीजोत्‍पादन क्षेत्राला संरक्षित सिंचन देणे शक्य होणार आहे. यावेळी कुलगुरू इंद्र मणी मिश्रा म्‍हणाले, की विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध वाणांच्‍या बियाण्यास शेतकऱ्यांची मोठी मागणी असल्यामुळे यंदा पैदासकार बीजोत्‍पादन दुप्‍पट करण्‍यासाठी प्रयत्न केले जात आहेत. डॉ. खर्गखराटे म्हणाले, की सोयाबीनच्‍या एमएयूएस-६१२, एमएयूएस-७१, एमएयुएस-७२५ आणि जेएस-२०-११६ तसेच तूर पिकांचा बीडीएन-७११, बीडीएन-१३४१ या वाणांचे पैदासकार बीजोत्‍पादन घेण्‍यात येणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com