Purandar Irrigation Scheme : पुरंदर उपसाचे नियोजन कोलमडले; खरीप धोक्यात

Agriculture Irrigation : एकीकडे पावसाने दिलेली ओढ तर दुसरीकडे पैसे भरूनही पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या कोलमडलेल्या नियोजनामुळे बारामती तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील खरीप हंगाम अडचणीत आला आहे.
Purandar Irrigation Scheme
Purandar Irrigation SchemeAgrowon
Published on
Updated on

Baramati News : एकीकडे पावसाने दिलेली ओढ तर दुसरीकडे पैसे भरूनही पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या कोलमडलेल्या नियोजनामुळे बारामती तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील खरीप हंगाम अडचणीत आला आहे. पुरेशा शाश्‍वत पाण्याअभावी येथील पिकांसाठी केलेला उत्पादनखर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बारामतीच्या जिरायती पट्ट्यात पावसाच्या पाण्याशिवाय शाश्‍वत सिंचनाअभावी शेतकऱ्यांची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून होती. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून मुळा मुठा नदीच्या संगमावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांमधून बारामती जिरायती भागाचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी पुरंदर उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाली.

Purandar Irrigation Scheme
Purandar Irrigation Scheme : पुरंदर उपासा'ची तीनही हंगामासाठी एकाच दराने पाणीपट्टी आकारणी

बारामती तालुक्यात जिरायती पट्ट्यातील काही गावांसाठी या योजनेचे पाणी २०१४ पासून सोडण्यास सुरुवात झाली. मात्र आजतागायत शेतकऱ्यांना पैसे भरूनही या योजनेचे मुबलक पाणी मिळाले नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. १ हजार २५० रुपये प्रति तास या दराने शेतकऱ्यांना पाणी मिळते मात्र पैसे भरण्याची तयारी असूनही शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेसे पाणी या योजनेचे व्यवस्थापन देऊ शकत नसल्याची जिरायती भागातील शेतकऱ्यांची व्यथा आहे.

वास्तविक या योजनेचे आठ विद्युत पंप तांत्रिक अडचणीमुळे बंद आहेत. त्यामुळे केवळ आठ पंपावर योजना चालविण्यासाठी अडचण येत आहे. आठ विद्युत पंपावर येणाऱ्या अतिरिक्तदाबामुळे मागणी होत असलेल्या ठिकाणी पाणी सोडण्याचे नियोजन कोलमडून जात असल्याची वस्तुस्थिती आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून टप्प्याटप्प्याने पुरंदर योजनेचे काम शेतकऱ्यांसाठी करण्यात आले. मात्र येणाऱ्या तांत्रिक अडचणी यामुळे नियमित पाणीपुरवठा व मागणी झाली, की त्वरित पाणीपुरवठा यासाठी अधिकारीदेखील उदासीन आहे.

Purandar Irrigation Scheme
Purandar Irrigation Scheme : पुरंदर उपसा जलसिंचनाच्या पाण्याच्या दरात वाढ नाही

पावसाने दिलेल्या ताणामुळे पैसे भरले, की पुरंदर उपसा सिंचन योजनेतून मुबलक पाणी मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी जनावरांची चारा पिके, बाजरी व इतर पिकांचे उत्पादन घेतले आहे. मात्र या योजनेतून शेतकऱ्यांनी कर्ज काढून उधार उसनवारी करून पैसे भरलेतरी वेळेवर पाणी मिळेल याची शाश्‍वती नसल्याची वस्तुस्थिती आहे.

भरमसाट खर्च, तुलनेत पाणी कमी

सुरुवातीपासून ते आजपर्यंत पुरंदर योजनेच्या सुरळीत पाणीवाटपास सुरुंग लागल्यामुळे शेतकऱ्यांची आशा फोल ठरली. ज्या तुलनेने शेतकऱ्यांना शाश्‍वत पाणी देण्यासाठी भरमसाट खर्च झाला त्या तुलनेत पाणी मिळत नसल्याची व्यथा जिरायती भाग पाणी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत भापकर, निवृत्ती ताम्हाणे, मासाळवाडीचे सरपंच मुरलीधर ठोंबरे, माउली भापकर, मंगेश खताळ, विनायक गाडे, विशाल पवार यांनी मांडली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com