
Agriculture Irrigation पुणे : पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या (Purandar Irrigation Scheme) पाण्याच्या दरात शासनाकडून कोणतीही वाढ करण्यात आली नाही.
२०१९-२०२० मध्ये असणाऱ्या दरानेच पाणीपट्टी (Water Bill) आकारण्यात येणार असल्याचे पत्रक शासनाच्या जलसंपदा विभाग, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ह. वि. गुणाल यांनी जाहीर केले आहे.
या निर्णयामुळे आता खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी प्रति एमसीएफटी १८ हजार ९२४ रुपये एवढा दर आकारण्यात येणार असून, यामुळे पुरंदर उपसा योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
शेतकऱ्यांना पाणी घ्यावे लागत होते; परंतु पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी यांनी याबाबत शासनाकडे जुन्या दराने पाणी देण्याची मागणी करून पाठपुरावा केला होता.
आता शासकीय उपसा सिंचन योजनासाठी पूर्वीप्रमाणे प्रति एमसीएफटी १९ टक्के प्रमाणे १३ हजार ६३७ रुपये, तसेच प्रवाही सिंचनाचे घनमापन १४ रुपये घनमीटर प्रमाणे ४ हजार ४०६ रुपये आणि स्थानिक उपकर २० टक्के ८८१ रुपये असे एकूण १८ हजार ९२४ रुपये असा दर असणार आहे.
याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने १ जुलै २०२२ पासून सुधारित जलदराचे पुनर्विलोकन केले असून, सन २०१९ ते २०२० मधील दर लागू केले आहेत.
शासनाने उपसा जलसिंचन योजनांमधील ग्राहकांना सवलतीचे दर लागू केले आहेत व त्याची अंमलबजावणी फेब्रुवारी २०२३ पासून चालू केली असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.
त्याप्रमाणे वीजदरातील सवलत व मजनिप्राचे सुधारित दर यानुसार पुरंदर उपसा सिंचनाच्या लाभक्षेत्रातील शेतक- याकडून १९ टक्के प्रमाणे आकारणी मान्यता देण्यात आली आहे. याबाबतच्या सूचना अधीक्षक अभियंता पुणे पाटबंधारे मंडळ यांना देण्यात आल्या आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.