Purandar Irrigation Scheme : पुरंदर उपासा'ची तीनही हंगामासाठी एकाच दराने पाणीपट्टी आकारणी

शेतकऱ्यांना मध्यंतरी अधिक दराने पाणी घ्यावे लागत होते. यामध्ये खरीप हंगामासाठी २८ हजार, रब्बी हंगामासाठी ३० हजार व उन्हाळी हंगामासाठी ३२ हजार रुपये आकारले जात होते.
Takari Irrigation Scheme
Takari Irrigation SchemeAgrowon
Published on
Updated on

Agriculture Irrigation माळशिरस, ता. १० : पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या (Purandar Irrigation Scheme) पाण्याच्या दरात शासनाकडून कोणतीही दर वाढ न करता सन २०१९- २०२० मध्ये असणाऱ्या दरानेच पाणीपट्टी (Water Bill) आकारण्यात येणार असल्याचे पत्रक शासनाच्या जलसंपदा विभाग, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ह. वि. गुणाल यांनी जाहीर केले आहे.

शेतकऱ्यांना मध्यंतरी अधिक दराने पाणी घ्यावे लागत होते. यामध्ये खरीप हंगामासाठी २८ हजार, रब्बी हंगामासाठी ३० हजार व उन्हाळी हंगामासाठी ३२ हजार रुपये आकारले जात होते. हे दर पूर्वीइतक्याच दराने आकारावे, अशी लाभार्थी शेतकऱ्यांची मागणी होती.

Takari Irrigation Scheme
Purandar Irrigation Scheme : ‘पुरंदर उपसा जलसिंचन’च्या पंप दुरुस्तीला सुरुवात

आमदार संजय जगताप यांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला होता. आता शासकीय उपसा सिंचन योजनेसाठी पूर्वीप्रमाणे प्रति एमसीएफटी १९ टक्क्यांप्रमाणे १३ हजार ६३७ रुपये व प्रवाही सिंचनाचे घनमापन १४ रुपये घनमीटरप्रमाणे ४ हजार ४०६ रुपये आणि स्थानिक उपकर २० टक्के ८८१ रुपये, असे एकूण १८ हजार ९२४ रुपये, असा दर असणार आहे.

Takari Irrigation Scheme
Agriculture Irrigation : ‘ताकारी’च्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांना दिलासा

शासनाने उपसा जलसिंचन योजनांमधील ग्राहकांना सवलतीचे दर लागू केले आहेत व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी फेब्रुवारी २०२३ पासून चालू केली असल्याचे सदर पत्रकात नमूद केले आहे.

त्याप्रमाणे वीज दरातील सवलत व सुधारित दर यानुसार पुरंदर उपसा सिंचनाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्याकडून १९ टक्क्यांप्रमाणे आकारणी मान्यता दिली असल्याचे सदर पत्रकात नमूद केले आहे.

याबाबतच्या सूचना अधिक्षक अभियंता पुणे पाटबंधारे मंडळ यांना दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी कमी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रति एमसीएफटी १८ हजार ९२४ रुपये

या निर्णयामुळे आता खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी प्रति एमसीएफटी १८ हजार ९२४ रुपये एवढा दर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे पुरंदर उपसा योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com