Jalgaon Dairy Election : खडसेंच्या नेतृत्वाखाली ‘मविआ’ लढणार

जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी आमदार एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली ‘महाविकास आघाडी’चे पॅनल करण्याचे निश्‍चित झाले आहे.
Milk Producers Union
Milk Producers UnionAgrowon
Published on
Updated on

जळगाव : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (Milk Producers Union) संचालकपदाच्या निवडणुकीसाठी आमदार एकनाथ खडसे (eknath Khadse) यांच्या नेतृत्वाखाली ‘महाविकास आघाडी’चे पॅनल करण्याचे निश्‍चित झाले आहे. पॅनलची एक जागा बिनविरोध झाली आहे. १९ जागांसाठी ४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. लवकरच उमेदवारांची नावे निश्‍चित करण्याचे पॅनलच्या बैठकीत ठरविण्यात आले.

Milk Producers Union
Crop Damage : नुकसानीबाबत साडेचार लाख दावे

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ॲड. रोहिणी खडसे यांच्या येथील निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली झाली. राष्ट्रवादी कॉंग्रसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, अरुणभाई गुजराथी, आमदार अनिल पाटील, गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, प्रदीप देशमुख, शिवसेनेच्या वैशाली सूर्यवंशी, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार उपस्थित होते.

श्री. खडसे म्हणाले , की जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी आम्ही ‘महाविकास आघाडी’ पॅनल तयार केले आहे. याच माध्यमातून आम्ही निवडणूक लढणार आहेत. आमची रावेर येथील एक जागा बिनविरोध झाली आहे. १९ उमेदवार निश्‍चित करून उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत.

Milk Producers Union
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

विरोधकांकडून गलिच्छ राजकारण : खडसे

एकनाथ खडसे म्हणाले, की विरोधकांकडून महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातही अत्यंत खालच्या दर्जाचे गलिच्छ राजकारण सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप ते करीत आहेत. मात्र, गेल्या सात वर्षांत जिल्हा दूध संघात आपण जे काम केले आहे. त्याबाबत जनता आमच्या पाठीशी आहे.

आपण संघाच्या मतदारांशी संपर्क साधला आहे. ते विरोधकांच्या गलिच्छ राजकारणाविरोधात आहे. जिल्हा दूध संघात अपहार ते सांगत आहे, ती मुळात चोरी आहे आणि हे आमच्या संचालकांच्या काळात घडलेले नाही, तर प्रशासकीय काळात घडले आहे. मात्र, पोलिसांवर दबाव आणून त्यांना कारवाई करण्यास भाग पाडले जात आहे. जनता विरोधकांना निवडणुकीत निश्‍चित उत्तर देईल.

मी महाविकास आघाडीतच : डॉ. सतीश पाटील

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले, की आपण महाविकास आघाडीच्या पॅनलमध्येच आहोत. पॅनलप्रमुख खडसे यांच्यामार्फतच सर्व निर्णय घेतले जातील. आपणास विरोधकांच्या पॅनलचे आमत्रंण आले होते. मात्र, भाजप म्हणून पॅनलला नकार दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com