Fodder Shortage : मराठवाड्यात ८५ दिवस पुरेल इतकाच चारा

Marathwada Fodder Scarcity : मराठवाड्यात ४८ लाख ६१ हजार ४४१ लहान, मोठी जनावरे आहेत. या जनावरांना दरदिवशी २५ हजार ५३७ टन चारा लागतो.
Fodder
FodderAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यात ४८ लाख ६१ हजार ४४१ लहान, मोठी जनावरे आहेत. या जनावरांना दरदिवशी २५ हजार ५३७ टन चारा लागतो. सध्यस्थितीत २१ लाख ७७ हजार २३१ टन चारा उपलब्ध आहे. हा चारा किमान ८५ दिवस पुरेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीतून ही माहिती पुढे आली. मराठवाड्यात नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील काही भागांचा अपवाद वगळता पाऊस स्थिती बिकट आहे. पावसाने यंदा चांगलीच दडी मारली आहे.

कशाबशा पावसावर पेरणी केलेली खरिपातील पिके उगवली खरी पण नंतर दडी मारलेल्या पावसाने पिके संकटात आली आहेत. ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद आदी सुका चारा निर्माण करणाऱ्या पिकांवर यंदा मर्यादा आल्या. या पिकांची अपेक्षित पेरणी झालीच नाही. त्यामुळे अपेक्षित चारा उपलब्ध होणार नाही, हे आधीच स्पष्ट होते.

Fodder
Fodder Sale : तंगीच्या काळात मजुरांना गवतकापणीतून रोजगार

बहुतांश भागात पाऊसच नसल्याने ओढे, नाले, नद्या आदींतील होता नव्हता तेवढा पाणीसाठा घटला आहे. त्यामुळे खरिपासह रब्बी हंगामाचे कसे होणार, हा प्रश्‍न शेतकऱ्यांना सतावतो आहे. पुढे अपेक्षित पाऊस न झाल्यास व त्यामुळे अपेक्षित चारा उपलब्ध न झाल्यास जनावरांचा प्रश्‍न गंभीर होण्याची शक्‍यता आहे. कृषिमंत्री मुंडे यांनी चारा पिकाचे नियोजन करण्याच्या सूचना नुकत्याच दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी कशी होणार हा प्रश्‍न आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, लहान जनावरास प्रतिदिन ३ किलो व मोठ्या जनावरास ६ किलो मिळून ४८ लाख ६१ हजार ४४१ जनावरांना २५ हजार ५३७ टन चाऱ्याची आवश्‍यकता आहे. सध्याच्या उपलब्ध चाऱ्यामध्ये खरीप व रब्बीत मिळणारा चारा, त्याचप्रमाणे बांधावरील पडीक, जमीन व वनक्षेत्रावरील चाऱ्याचा समावेश आहे.

धुऱ्या बंधाऱ्यांवर गवताची काडीही दिसेना

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर व परभणी जिल्ह्यांतील शेतशिवारांतील धुऱ्या बंधाऱ्यांवर गवतच वाढले नसल्याची स्थिती आहे. अनेक पशुपालक त्यांच्याकडील चारा संपल्याने वाढ न झालेल्या गवतावर आपल्या जनावरांची भूक भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या धुऱ्या बंधाऱ्यांवरील तोंडात न येणारे गवत कसे बसे चघळून दिवस काढण्याची वेळ जनावरांवर आली आहे.

Fodder
Fodder Shortage : पाऊस न झाल्याने चाराटंचाईच्या झळा

जिहानिहाय जनावरांची संख्या (आकडे लाखांत)

छत्रपती संभाजीनगर : ६३३००३

जालना : ५०३०७२

परभणी : ६१४५१३

बीड : ७५४८०८

लातूर : ५११६५०

धाराशीव : ७९०३९९

नांदेड : ७४७६६८

हिंगोली : ३०६३२८

जिल्हानिहाय प्रतिदिन आवश्‍यक चारा (टनांत)

छत्रपती संभाजीनगर : ३३२३

जालना : २८१६

परभणी : २९३२

बीड : ४०५४

लातूर : २६०९

धाराशीव : ४०२४

नांदेड : ४०९३

हिंगोली : १६८५

जिल्हानिहाय उपलब्ध चारा (टनांत)

छत्रपती संभाजीनगर :२२२७००

जालना : १५८८४९

परभणी : १७९११७

बीड : ६७२८९१

लातूर : २३४८४६

धाराशीव : ३६२१४२

नांदेड : २४५५९८

हिंगोली : १०१०८८

जिल्हानिहाय उपलब्ध चारा किती दिवस पुरणार?

छत्रपती संभाजीनगर : ६७

जालना : ५६

परभणी : ६१

बीड : १६६

लातूर : ९०

धाराशीव : ९०

नांदेड : ६०

हिंगोली : ६०

जिल्हानिहाय सप्टेंबरपर्यंत आवश्‍यक चारा (लाख टनांत)

छत्रपती संभाजीनगर : ११९६२८

जालना : १०१३७६

परभणी : १०५५५२

बीड : १४५९४४

लातूर : ९३९२४

धाराशीव : १४४६८४

नांदेड : १४७३४८

हिंगोली : ६०६६०

उपलब्ध चाऱ्याला उसाची जोड देवून तो पुरविणे सुरू आहे. तो किमान तीन महिने पुरेल. मात्र नंतर रब्बीतील ज्वारीच्या चाऱ्यावरच भिस्त असेल.
- लहू बडे, देवदहिफळ ता. धारूर, जि. बीड.
दुभत्या ९ व गाभण २ अशा ११ गायी आहेत. पाणी हाय तवर घास निघल. मुरघास फक्‍त महिनाभर पुरल. पाऊस काही येईना. बांधावरबी चारा वाढला नाही. असंच राहिलं तरं महिनाभरानं जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्‍न असल
- गोकूळ बनकर, लाखगंगा, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com