Fodder Shortage : पाऊस न झाल्याने चाराटंचाईच्या झळा

Kharif Season : पावसाचे जवळपास तीन महिने संपले असून, अद्याप नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने अनेक तालुक्यांमध्ये खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
Dry Fodder
Dry FodderAgrowon

Nashik News : पावसाचे जवळपास तीन महिने संपले असून, अद्याप नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने अनेक तालुक्यांमध्ये खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पशुपालकांनी साठवून ठेवलेला कोरडा चारा संपला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत घास व गवत भरण्यासाठी पाणी न राहिल्याने निफाड तालुक्यातून चाऱ्यासाठी उसाला मागणी वाढली आहे.

Dry Fodder
Fodder Shortage : चाराटंचाईमुळे आंतरजिल्हा वाहतुकीला बंदी : विखे पाटील

नाशिक जिल्ह्यातही अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी खरीप हंगामातील मका, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके पावसाअभावी करपू लागली आहेत. अनेक ठिकाणी मनुष्य व जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. जिल्ह्यात भीषण चाराटंचाई निर्माण झाली आहे. येवला, चांदवड, मनमाड, सिन्नर आदी ठिकाणचे पशुपालक चाऱ्यासाठी निफाड तालुक्यातून ऊस घेऊन जात आहेत.

Dry Fodder
Fodder Depot : दुष्काळी स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात चारा डेपोचे नियोजन करा

साधारणपणे ४ ते ६ हजार रुपये गुंठ्याप्रमाणे ऊस विकला जात आहे. दररोज तालुक्यातून शंभरच्या आसपास ट्रॅक्टर भरून जात आहेत. पशुपालकांकडील साठवून ठेवलेला कोरडा चारा संपला असून, हिरवा चारा म्हणून लागवड केलेले गवत, घास, मका, खोंडे आदींना भरण्यासाठी पाणी नाही. अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी नसल्याने दुग्ध उत्पादनावरही या दुष्काळाचा परिणाम भविष्यात दिसून येणार आहे.

त्याचप्रमाणे अजून काही काळ वेळेवर पाऊस न झाल्यास तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर उसाची विक्री होईल व गाळपासाठी कारखान्यांना ऊस मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

जूनमध्ये पाऊस न झाल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी मका, गवत, खोडे आदीची पेरणी करता आली नाही. त्यामुळे चाराटंचाई निर्माण झाली आहे. हिरवा चारा म्हणून लागवड केलेले गवत, घास पाण्याअभावी वाळले आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील ऊस विकत आणून पशुधन जगविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
-पोपट काळे, पशुपालक, रेडगाव
पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले, तरी जोरदार पाऊस झालेला नाही. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील पिके पूर्णतः वाया गेली असून, पाऊस झाला तरी खरीप पिकांना फायदा होणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून खरिपातील पीक विम्याची रक्कम देणे सुरू करावे. पशुधनाच्या संख्येनुसार शेतकऱ्याला चारा उपलब्ध करून द्यावा.
- राजेंद्र बोरगुडे, संचालक, बाजार समिती, लासलगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com