Fodder Sale : तंगीच्या काळात मजुरांना गवतकापणीतून रोजगार

Green Fodder : गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप सुरू आहे. त्यामुळे गवत चांगले हिरवेगार उगवले आहे. या चाऱ्याच्या विक्रीतून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत आहे.
Green Fodder
Green FodderAgrowon

Vikramgad News : तालुक्यातील ग्रामीण भागात आता भातलावणीची कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप सुरू आहे. त्यामुळे गवत चांगले हिरवेगार उगवले आहे. या चाऱ्याच्या विक्रीतून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत आहे. तसेच तंगीच्या काळात मजुरांना कापणीचे काम मिळत असल्याने त्यांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्‍न मिटत आहे.

Green Fodder
Fodder Shortage : पशुधनाच्या चारा, पाण्याचा प्रश्‍न बिकट

विक्रमगड तालुक्याला वनसंपदा मोठ्या प्रमाणात असल्याने जनावरांसाठी चारा मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसांमध्ये शेताचे बंधारे, माळरानावर हिरवे गवत उगवते. साधारणपणे श्रावणात माळरानावर, जंगलात नैसर्गिक उगवणाऱ्या गवताला चांगलाच बहर येतो; मात्र हे गवत मोठ्या प्रमाणात असल्याने जनावरांना चरण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होत नाही.

Green Fodder
Fodder Shortage : चाराटंचाईमुळे आंतरजिल्हा वाहतुकीला बंदी : विखे पाटील

त्यामुळे त्याची विक्री करण्यात येते. शेतीची कामे संपल्यानंतर गणेशोत्सव आणि दिवाळी सणापूर्वी शेतकऱ्यांसह मजुरांना आर्थिक चणचण भासते. पावसाळ्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे काही अंशी बंद आहेत.

अशा वेळी या दिवसांत संकटावर मात करून सोन्याचे दिवस दाखवणारा गवताचा व्यवसाय तंगीत सापडलेल्या मजुरांसाठी मोठा आधार ठरत आहे. तालुक्यातील दादडे, केव, म्हसरोली, हातणे, पाचमाड, मलवाडा या परिसरात गवत विक्रीचा व्यवसाय सुरू झाला आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी वर्ग नैसर्गिक उगवणाऱ्या गवताच्या विक्रीतून चांगले अथार्जन करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com