Jowar : बीड जिल्ह्यात ३३९२८ हेक्टरवर ज्वारी प्रात्यक्षिक अभियान

बीड : जिल्ह्यात ३३९२८ हेक्टर वर हा कार्यक्रम राबविण्याचे नियोजन आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, पौष्टिक तृणधान्य योजनेंतर्गत ३३९२८ हेक्टरवर रब्बी ज्वारी प्रात्यक्षिकाचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. के. जेजुरकर यांनी दिली.
 Jowar Cultivation
Jowar CultivationAgrowon
Published on
Updated on

बीड : जिल्ह्यात ३३९२८ हेक्टर वर हा कार्यक्रम राबविण्याचे नियोजन आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (National Food Security Program), पौष्टिक तृणधान्य (Cereal) योजनेंतर्गत ३३९२८ हेक्टरवर रब्बी ज्वारी प्रात्यक्षिकाचे (Rabi Jowar Demonstration) नियोजन असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. के. जेजुरकर यांनी दिली.

 Jowar Cultivation
Jowar Cultivation : पौष्टिक ज्वारीची रब्बीत करुया लागवड

श्री. जेजुरकर म्हणाले, की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-पौष्टिक तृणधान्य या योजने अंतर्गत जिल्ह्यात ज्वारी पिकाचे पीक प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. यात अनुदानावर फुले रेवती व फुले सुचित्र या वाणाचे १०० टक्के अनुदानावर लाभ दिला जाणार आहे.

 Jowar Cultivation
Rabi Jowar : मूलस्थानी जलसंधारणासह सुधारित जातींचा वापर आवश्यक

या योजनेत वाटप करण्यात येणाऱ्या ज्वारी वाणाचे गुण वैशिष्ठ ज्वारी पिकाचे ताटे भरीव, रसदार व गोड असल्याने कडबा जनावरे गोडीने खातात व यास बाजारभाव चांगला मिळतो. तसेच ज्वारी दाणे चमकदार असतात. उत्पादित मालास बाजारभाव चांगला मिळतो. तसेच सदरील वाण खोडमाशी, खोडकिडीसाठी प्रतीबंधक आहे. उच्च गुणवत्ता असलेले १० वर्षा आतील सुधारित वाणांचा यात समावेश आहे. प्रती शेतकरी अधिकतम १ हेक्टर क्षेत्रावर लाभ दिला जाईल.

ज्वारी प्रात्यक्षिकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधव यांनी आपले सरकार पोर्टल वर नोंदणी करावी. ऑनलाइन अर्ज केलेले लाभार्थी यांना लाभ देऊन बियाणे शिल्लक राहिल्यास शेतकरी वर्गास परमीट देऊनही लाभ देता येईल.

त्यासाठी आपले गावाचे कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी यांना ७/१२, ८अ, आधार कार्ड, बँक पासबुक सह शेतकरी बांधवांनी भेटावे जिल्ह्यातील या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री जेजुरकर यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com