Sugarcane Season : ‘जरंडेश्‍वर’ची गाळपात, उताऱ्यात सह्याद्री आघाडीवर

अडसालीचे वाढलेले क्षेत्र जिल्ह्यातील साखर कारखान्यांची डोकेदुखी ठरली असून, सध्या गाळप हंगाम मध्यावर आलेला आहे. या वर्षी काही कारखान्यांनी क्षमता वाढवल्यामुळे एप्रिलपर्यंत हंगाम अटोपण्याची शक्यता आहे.
Sugarcane Season
Sugarcane SeasonAgrowon

सातारा : अडसालीचे वाढलेले क्षेत्र जिल्ह्यातील साखर कारखान्यांची (Sugar Factory) डोकेदुखी ठरली असून, सध्या गाळप हंगाम (Sugarcane Crushing Season) मध्यावर आलेला आहे. या वर्षी काही कारखान्यांनी क्षमता वाढवल्यामुळे एप्रिलपर्यंत हंगाम अटोपण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी मिळून ६३ लाख ८९ हजार टन उसाचे गाळप करून ६३ लाख ३३ हजार क्विंटल साखरेची निर्मिती (Sugar Production) केली आहे.

सरासरी ९.९१ टक्के साखर उतारा मिळाला आहे. जरंडेश्‍वर कारखान्याने गाळपात, तर साखर उताऱ्यात सह्याद्री साखर कारखाने आघाडी घेतली आहे.

Sugarcane Season
Sugar Factory Award : ‘थोरात कारखान्या’चा ऊस विकासाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

खासगी सात व सहकारी आठ असे १५ कारखाने गाळप करत असून या वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. या वर्षी बहुतांशी कारखान्यांनी आपली क्षमता वाढविली असल्याने गाळपाचा वेग चांगला असल्याने बऱ्यापैकी ऊस तुटला आहे.

वेळेत ऊस तुटावा यासाठी शेतकऱ्यांनी अडसाली ऊस लागवडीवर भर दिला आहे. परिणामी, अडसालीचे क्षेत्र वाढल्याने हा ऊस सर्वप्रथम गाळपासाठी आणावा लागत आहे.

परिणामी, सुरू व पूर्वहंगामी ऊस तोडण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या उसाला उशीर होत आहे. तसेच उशीर झालेल्या उसाच्या तोडणीसाठी तोडणी टोळ्यांकडून जादा पैशांची मागणी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री बसत आहे.

जिल्ह्यातील खासगी कारखान्यांनी आतापर्यंत ३७ लाख ९१ हजार, २९७ टन उसाचे गाळप करून ३४ लाख ६७ हजार ७५५ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सरासरी साखर उतारा ९.१५ टक्के मिळाला आहे.

सहकारी कारखान्यांनी २५ लाख ९८ हजार ६०६ टन उसाचे गाळप करून २८ लाख ६५ हजार ४७० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. या कारखान्यांचा सरासरी उतारा ११.०३ टक्के आहे.

Sugarcane Season
Sugar Factory : ‘वसाका’चे अवसायक बेकायदा; कार्यमुक्त करा

खासगी कारखान्यांमध्ये जरंडेश्‍वर कारखान्याने गाळपात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांनी आतापर्यंत ११ लाख ५१ हजार ०२० टन उसाचे गाळप करून ११ लाख ५८ हजार ७०० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.

तर सहकारी कारखान्यात कृष्णा कारखान्याने सहा लाख तीन हजार २८० टन उसाचे गाळप करत सहा लाख १४ हजार ४७० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.

साखर उताऱ्यात सह्याद्री कारखाना आघाडीवर असून, त्यांना ११.८१ टक्के साखर उतारा मिळाला आहे. तर खासगीत खटाव-माण ॲग्रो प्रोसेसिंग युनिटला १०.९५ टक्के साखर उतारा मिळाला आहे.

कारखानानिहाय ऊसगाळप (टन) व कंसात साखरनिर्मिती (क्विंटलमध्ये) अशी :

सहकारी कारखाने - श्रीराम जवाहर कारखाना २४५२८६ (२८३६५०), कृष्णा ६०३२८० (६१४४७०), किसन वीर २८३०१०(३१६९७०), बाळासाहेब देसाई १३३३१५ (१५६१००), सह्याद्री ५४४४०० (६४२७४०), अजिंक्यतारा ३३७९९५ (३४७३३०), रयत ३२१४७० (३७७०६०), खंडाळा १२९८५० (१२८१५०).

खासगी कारखाने : दत्त इंडिया साखरवाडी ४३९६०२ (२७३०००), जरंडेश्‍वर ११५१०२०(११५८७००), जयवंत शुगर ३८७७४५ (४१४३५०), ग्रीन पॉवर शुगर ३७८७१०(३७४५५०), स्वराज्य इंडिया ॲग्रो ३८१८४९(३०३२५५), शरयू ॲग्रो ६०३६५५(४५२६५०), खटाव-माण तालुका ॲग्रो ४४८७१०(४९१२५०).

(सदरची आकडेवारी ही साखर आयुक्त कार्यालयाच्या २७ जानेवारीच्या अहवालानुसार आहे.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com