Sugar Factory : ‘वसाका’चे अवसायक बेकायदा; कार्यमुक्त करा

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना थकीत कर्ज वसुलीकरिता राज्य सहकारी बँकेने महाराष्ट्र सरफेशी कायदानुसार कारखाना मालमत्ता जप्त केली आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon

कळवण, जि. नाशिक : जिल्ह्यातील देवळा, कळवण, सटाणा, मालेगाव तालुक्यांचे कार्यक्षेत्र व प्रमुख अर्थकारण असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर (Vasantdada Patil Cooperative Sugar Factory) नियुक्त अवसायकाची नियुक्ती सहकार कायद्यातील तरतुदीनुसार बेकायदा असल्याने कारखाना हा अवसायक कार्यमुक्त करावा, अशी मागणी ‘वसाका’ बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे (Sunil Deore) यांनी केली. याबाबत राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे (Cooperation Minister Atul Save) यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना थकीत कर्ज वसुलीकरिता राज्य सहकारी बँकेने महाराष्ट्र सरफेशी कायदानुसार कारखाना मालमत्ता जप्त केली आहे.

बँकेने कारखाना केवळ जप्त केला असून ही बँकेची अंतिम मालमत्ता नाही. कारखाना बँकेने परस्पर मे. धाराशिव साखर उद्योग यांना अत्यल्प वार्षिक भाडेतत्त्वावर, प्रदीर्घ काळाकरिता दिला आहे.

मूळात हा करारच अव्यवहार्य असताना, अवसायक या संकल्पनेऐवजी प्रशासक किंवा प्राधिकृत मंडळ नियुक्त होणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलमान्वये संचालक मंडळातील दोष निर्माण झाला असेल, तर संस्थेच्या कामकाजाकरिता प्राधिकृत मंडळ नियुक्तीची तरतूद असल्याने निर्णय अपेक्षित असल्याचे देवरे यांनी लक्षात आणून दिले.

कारखाना सुरू असताना झालेली किमान ५ लाख टन गाळप होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून, पुढील कार्यकाळात हे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी धाराशिव साखर उद्योग, उस्मानाबाद यांची हमी घ्यावी.

हमी देणार नसेल, तर भाडे करार रद्द करावा, २६ हजार सभासदांचे सभासदत्व पुन्हा पुनर्स्थापित करावे, अशी मागणी देवरे यांनी केली.

Sugar Factory
‘वसाका’ सुरू होण्याच्या हालचालींना वेग

अवसायक चौकशीप्रकरणी आदेश धाब्यावर

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर नियुक्त अवसायक कार्यमुक्त करण्यासह कारखाना कामकाज व व्यक्तिशः जबाबदारी निश्चित करणारी कलम ८८ खालील चौकशी कामकाजाचा प्रगती अहवाल सादर करावा तसेच सभासद हक्क पुनर्स्थापित होण्यासाठी सुनावणी घेण्याबाबत सहकार आयुक्त यांनी २८ जानेवारी २०२२ रोजी निर्देश दिले होते.

परंतु आयुक्त यांनी दिलेले आदेश धाब्यावर बसवत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे सांगून हा पत्रव्यवहार सहकारमंत्री सावे यांना सादर करून कार्यवाही करावी, अशी मागणी सुनील देवरे यांनी केली.

सहकारमंत्री घेणार बैठक

कारखान्याच्या समस्याप्रश्नी सहकारमंत्री लवकरच बैठक घेणार असून या बैठकीसाठी राज्य सहकारी बँक, सहकार आयुक्त, साखर आयुक्त, कारखाना प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व संबंधितांची बैठक होणार असून, पालकमंत्री दादा भुसे, आमदार डॉ. राहुल आहेर, नितीन पवार, कारखाना अध्यक्ष अभिजित पाटील, पक्षांचे व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, पंडितराव निकम, प्रभाकर पाटील, सुधाकर पगार, जितेंद्र पगार, देविदास पवार, दिनकर जाधव, आनंद देवरे, मोठाभाऊ देवरेंसह कार्यक्षेत्रातील संबधित व्यक्तींना निमंत्रित करणार असल्याचे देवरे यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com