Sugar Factory Award : ‘थोरात कारखान्या’चा ऊस विकासाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

मांजरी (पुणे) येथे झालेल्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड यांच्यातर्फे देण्यात येणारा राष्ट्रीय पातळीवरचा ऊस विकासाचा पुरस्कार कारखान्याचे प्रतापराव ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे यांनी स्वीकारला.
Sugar Factory Award
Sugar Factory Award Agrowon

नगर : आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला (Sahakar Maharshi Bhausaheb Thorat Sahakar Sugar Factory) राष्ट्रीय पातळीवरील ऊस विकासाचा राष्ट्रीय पुरस्कार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (Vasantdada Sugar Institute) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मांजरी (पुणे) येथे झालेल्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड यांच्यातर्फे देण्यात येणारा राष्ट्रीय पातळीवरचा ऊस विकासाचा पुरस्कार कारखान्याचे प्रतापराव ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे यांनी स्वीकारला.

या वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार जयंत पाटील, ‘व्हीएसआय’चे उपाध्यक्ष दिलीप वळसे, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब पाटील, विश्वजित कदम, जयप्रकाश दांडेगावकर, प्रकाश नाईकनवरे, संभाजी कडू आदी उपस्थित होते.

संगमनेरच्या सहकाराचा राज्य व देशाला दिशादर्शक ठरत आहे. मागील अनेक वर्षे ऑडिटचा ‘अ’ दर्जा राखून कारखान्याने सातत्याने सामाजिक उपक्रमांत सहभाग नोंदविला आहे. कार्यक्षेत्रासह कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केला आहे.

Sugar Factory Award
Sugar Factory : शिरपूर साखर कारखाना सुरू होणार

मागील हंगामात १५ लाख ५१ हजार मेट्रीक टनांचे उच्चांकी गाळप करून विक्रमी भाव दिला आहे. तसेच ऊस विकासासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले आहेत.

या वेळी कारखान्याच्या संचालक मंडळासह कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सचिव किरण कानवडे, शेतकी अधिकारी बी. बी. खर्डे, ऊसविकास अधिकारी बी. पी. सोनवणे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com