
बुलडाणा ः सिंदखेडराजा तालुक्यात दरवर्षी मिरची लागवड (Chili Cultivation) करीत हजारोंचे उत्पादन (Chili Production) अनेक शेतकरी घेतात. परंतु बियाणे कंपन्या (Seed Company) आता चलाखी करून शेतकऱ्यांना फसवू लागल्या आहेत. यंदाच्या हंगामात या तालुक्यात एका नामांकित कंपनीकडून शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाची मिरची रोपे (Inferior Chili Plant) पुरवण्यात आल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
झाडांवर अनेक दिवस लोटूनही फूल किंवा फूल, फळ धारणा झालेली नाही. यामुळे काहींनी मिरची उपटूनही टाकली. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, तसेच संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली.
या बाबत शेतकऱ्यांनी कंपनी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. परंतु हे अधिकारी एकमेकांवर चालढकल करीत आहेत. अखेरीस शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत मेहकर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात तालुका तक्रार निवारण समितीने शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मिरची पिकाची पाहणी केली. रोपांमध्ये दोष असल्याने पिकाची वाढ झाली नाही.
परिणामी फळधारणाही नाही. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे मत समितीनेही मांडले. उपविभागीय अधिकारी ए. के. मिसाळ, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. पी. जायभाये, तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड, पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी अंकुश म्हस्के, कृषिविस्तार अधिकारी डी. एस. दराडे आदी या पथकात होते.
सिंदखेडराजा तालुक्यात दरेगाव येथील शालीग्राम गाडे, शिवाजी काळे, भागवत बंगाळे, जगन्नाथ बंगाळे, प्रल्हाद काळुसे, रामकिसन वायाळ यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी जालना येथील एका कंपनीमार्फत नवतेज व वैष्णवी या वाणाच्या रोपांची मागणी केली होती. त्यांना ही रोपे पुरवण्यात आल्यानंतर १५ जुलैदरम्यान लागवड केली. त्यानंतर बरेच दिवस लोटूनसुद्धा रोपांची वाढ झाली नाही. त्यावर ना फूल धारणा झाली ना मिरची लागली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.