Dairy Festival : कोल्हापुरात होणार ‘इंडियन डेअरी फेस्टिव्हल’

या फेस्टिव्हल अंतर्गत हॉटेल सयाजी येथे दूध परिषद होणार आहे. देशातील दुग्ध व्यवसाय संधी आव्हाने दूध उत्पादनात वाढ आणि २०३० पर्यंत ठरवण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ सर्व घटक आणि सरकारी व्यवस्था एकत्रित येणार आहेत.
Milk Prices
Milk PricesAgrowon

कोल्हापूर : इंडियन डेअरी असोसिएशन (Indian Dairy Association) आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी) (National Dairy Development Board) यांच्या संयुक्त विद्यमाने २० ते २२ जानेवारी २०२३ या कालावधीत इंडियन डेअरी फेस्टिव्हलचे (Indian Dairy Festival) येथे आयोजन केले आहे, अशी माहिती प्रमुख संयोजक व गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके यांनी गुरुवारी (ता. १) पत्रकार परिषदेत दिली.

Milk Prices
Jalgaon Dairy Election : जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक २० डिसेंबरनंतर

ते म्हणाले, की या फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांतील सहकारी व खासगी दूध संघ, देशातील डेअरी उद्योगातील सर्व सहयोगी घटक सहभागी होणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या फेस्टिव्हलमध्ये वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले आहे. कोल्हापूर विभागात प्रथमच अशा प्रकारचा फेस्टिव्हल होणार आहे.

Milk Prices
Dairy : विदर्भ-मराठवाड्यात दुधाचे संकलन अडीच लाख लिटरवर

या फेस्टिव्हल अंतर्गत हॉटेल सयाजी येथे दूध परिषद होणार आहे. देशातील दुग्ध व्यवसाय संधी आव्हाने दूध उत्पादनात वाढ आणि २०३० पर्यंत ठरवण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ सर्व घटक आणि सरकारी व्यवस्था एकत्रित येणार आहेत. यासोबत दूध उत्पादक शेतकऱ्यापासून दूध संस्था दूध प्रक्रिया संघ आणि ग्राहक या सर्व घटकांना लागणारी आवश्यक माहिती तंत्रज्ञान एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी शाहूपुरी जिमखाना मैदान येथे डेअरी एक्सपो होणार आहे.

पत्रकार परिषदेला गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके, चितळे डेअरीचे गिरीश चितळे, वारणा डेअरीचे अनिल हेरलेकर, जे.बी.पाटील, भारत डेअरीचे किरीट मेहता, थोरात डेअरीचे आबासाहेब थोरात, विराज डेअरीचे विशाल पाटील, गोविंद डेअरीचे संजीवराजे निंबाळकर, राजारामबापू दूध संघाचे नेताजीराव पाटील, कुटवळ डेअरीचे प्रकाश कुटवळ, थोपटे डेअरीचे नितीन थोपटे, समाधान डेअरीचे राहुल थोरात, विमल डेअरीचे सुभाष मयेकर, दत्त इंडिया डेअरीचे सबर्जित आहुजा, मयूरेश टेक्नोलॉजीचे संजीव गोखले यांच्यासह विविध डेअरींचे अधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com