Jalgaon Dairy Election : जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक २० डिसेंबरनंतर

राज्यात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तसेच सहकारी संस्थांच्याही निवडणुका आहेत.
Milk Union Elections
Milk Union Elections Agrowon

जळगाव : राज्यात ग्रामपंचायत निवडणुका (Gram Panchayat Elections) जाहीर झाल्या आहेत. तसेच सहकारी संस्थांच्याही निवडणुका ( Cooperative Elections) आहेत. दोन्हीचे कार्यक्षेत्र ग्रामीण भाग असल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील न्यायालयीन आदेशानुसार निवडणुका होत असलेल्या सहकारी संस्था वगळून ‘अ’ व ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करून २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Milk Union Elections
Market Committee Election : शेतकऱ्यांना उमेदवारी कोणत्या गटातून?

त्यानंतर आहे त्या टप्प्यावर प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामुळे आता जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकांची प्रक्रिया स्थगित झाली असून, २० डिसेंबरनंतर प्रक्रियेला पुन्हा प्रारंभ होईल. राज्याचे सहकार, पणन, वस्त्रोद्योग विभागातर्फे राज्याचे विशेष कार्यकारी अधिकारी, सहनिबंधक सहकारी संस्था यांनी मंगळवारी (ता. २९) हे आदेश जारी केलेत.

या आदेशात त्यांनी म्हटले आहे, की राज्यातील ७७५१ ग्रामंपचायतीचा निवडणूक कार्यक्रम १८ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत जाहीर करण्यात आला आहे. तसेच राज्यातील ७१४७ सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रमदेखील सुरू करण्यात आला आहे. यात ‘अ’ वर्ग ३८, ‘ब’ वर्ग ११७०, ‘क’ वर्ग ३१५१ व ‘ड’ वर्गातील २७८८ संस्था आहेत.

शासनाने आज जारी केलेल्या अध्यादेशानुसार जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. २० डिसेंबरनंतर शासन आदेश आल्यानंतर निवडणूक चिन्ह जाहीर झाल्यानंतर मतदानाच्या तारखेपर्यंत जेवढे दिवस आहेत, तेवढ्या दिवसाचा कालावधी ठेवून निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात येईल. - संतोष बिडवई, निवडणूक निर्णय अधिकारी, जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ संचालक निवडणूक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com