MAFSU Student Strike : ‘माफसू’च्या विद्यार्थ्यांच्या बेमुदत बंदला सुरवात

MAFSU Veterinary University : एकीकडे शासकीय पशुवैद्यक महाविद्यालयाची पदभरती प्रकिया रेंगाळत ठेवायची आणि दुसरीकडे अर्थलाभासाठी खासगी महाविद्यालयांना परवानगी द्यायची.
MAFSU
MAFSU Agrowon

Nagpur News : ‘‘एकीकडे शासकीय पशुवैद्यक महाविद्यालयाची पदभरती प्रकिया रेंगाळत ठेवायची आणि दुसरीकडे अर्थलाभासाठी खासगी महाविद्यालयांना परवानगी द्यायची. सोबतच बारावीनंतर डिप्लोमा अभ्यासक्रमाला मान्यता देत बेरोजगारी वाढविण्यासाठी पुढाकार घ्यायचा. शासनाच्या या अन्यायकारक धोरणाविरोधात एकत्रित येत ‘माफसू’च्या विद्यार्थ्यांनी गुरुवार (ता.२७) पासून महाविद्यालय बेमुदत बंद केली आहेत.

MAFSU
MAFSU : ‘माफसू’चे विद्यार्थी वापरतात ५० वर्षे जुने फर्निचर

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत राज्यात सहा शासकीय पदवी व पदव्युत्तर महाविद्यालये आहेत. त्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापकांची भरती केलेली नाही. शैक्षणिक दर्जावर त्याचा परिणाम होत आहे.

तत्कालीन कुलगुरू डॉ. अशोक निनावे यांच्या कार्यकाळात ‘माफसू’मध्ये मोठी भरती झाली. त्यात प्रचंड गैरप्रकार झाला. यानंतर एकाही कुलगुरूने भरती प्रक्रिया राबविण्याचे धाडस केले नाही. परिणामी रिक्‍त पदांचा डोंगर निर्माण झाला. ‘माफसू’चा शैक्षणिक दर्जाही खालावला आहे.

MAFSU
MAFSU : ‘माफसू’ कुलगुरूंच्या स्पर्धेतील व्यक्‍ती ठरली होती वादग्रस्त

दरम्यान, पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून बारावीनंतरच्या चार वर्षीय डिप्लोमा अभ्यासक्रमाला मान्यता देण्याचे जाहीर केले आहे. डिप्लोमाधारक हे जनावरांवर उपचार करून शासकीय पदभरतीमध्ये अनेक जागांवरही दावा करतात.

पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय ठरेल. त्यामुळे रिक्‍त पदे भरावी. ‘डिप्लोमा’ची मान्यता रद्द करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. गुरुवारी नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय परिसरात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालय बेमुदत बंद करून परिसरात प्रचंड घोषणाबाजी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com