Weather Update : किमान तापमानात वाढ, गारठा कायम

राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतलेली थंडी हळूहळू कमी होऊ लागली आहे. किमान तापमानात वाढ होत असून, उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाड्यात गारठा कायम आहे.
Cold Weather
Cold WeatherAgrowon
Published on: 
Updated on: 

Weather Update News पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतलेली थंडी (Cold) हळूहळू कमी होऊ लागली आहे. किमान तापमानात (Minimum Temperature) वाढ होत असून, उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाड्यात गारठा (Cold Weather) कायम आहे. आज (ता. ७) राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. ६) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ९ अंश, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ९.३ तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Cold Weather
Climate Change : हवामान बदलाचा करा सखोल अभ्यास

राज्याच्या उर्वरित भागात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा ११ अंशांच्या वर गेला आहे. कमाल तापमानातही वाढ होत असून, अनेक ठिकाणी पारा ३१ अंशांच्या वर असून, उकाड्यात वाढ होत आहे. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Cold Weather
Climate Change : वातावरण बदल, पाणी यांचा परस्परसंबंध

राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, उत्तर भारतात उद्यापासून नवीन पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव जाणवणार आहे. उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी झाली आहे.

सोमवारी (ता. ६) मध्य प्रदेशातील मालाजखंड येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता.७) उत्तर पश्चिम बंगाल आणि सिक्कीम राज्यात तुरळक ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तर अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयसह ईशान्य भारतातील राज्यात विजा, गारपिटीसह पावसाची शक्यता आहे.

सोमवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३३.१ (११.५), जळगाव ३३.६ (१०.३), धुळे ३१.०(९.०), कोल्हापूर ३२.४(१८.३), महाबळेश्वर २९.१ (१५.०), नाशिक ३१.८ (१२.५), निफाड ३१.२ (९.८), सांगली ३३.१ (१६.९), सातारा ३२.७ (१४.०), सोलापूर ३४.८ (१६.७),

सांताक्रूझ ३३.१ (१८.९), डहाणू ३३.४ (१६.१), रत्नागिरी ३६.१(१८.५), औरंगाबाद ३१.६ (१०.४), नांदेड - (१४.०), उस्मानाबाद ३३.०(१७.०), परभणी ३३.०(१७.०), अकोला ३४.० (१३.०), अमरावती ३२.८(१२.५),

बुलडाणा ३१.०(१५.०), ब्रह्मपुरी ३४.२ (१२.२), चंद्रपूर ३१.२(१२.४), गडचिरोली ३१.४(१२.६), गोंदिया ३२.० (१२.२), नागपूर ३२.० (११.३), वर्धा ३२.५(१२.२), वाशीम - (१४.४), यवतमाळ ३२.५ (१४.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.