Groundnut Cultivation : भुईमूग लागवडीत वाढ शक्य

खानदेशात यंदाही भुईमुगाच्या क्षेत्रात वाढ होईल, असे दिसत आहे. अनेक भागांत पेरणी किंवा लागवड पूर्ण झाली आहे.
Groundnut Cultivation
Groundnut CultivationAgrowon

जळगाव ः खानदेशात यंदाही भुईमुगाच्या क्षेत्रात (Groundnut Acreage) वाढ होईल, असे दिसत आहे. अनेक भागांत पेरणी (Groundnut Cultivation) किंवा लागवड पूर्ण झाली आहे. सुमारे एक ते दीड हजार हेक्टरवर भुईमुगाचे एकूण क्षेत्र राहील, असाही अंदाज आहे.

Groundnut Cultivation
Groundnut Cultivation : रब्बी भुईमूग लागवड तंत्र

भुईमुगाची लागवड खानदेशात मागील तीन वर्षे सतत वाढली आहे. पाऊसमान चांगले आहे. यामुळे ही लागवड वाढली आहे. तापी व गिरणा काठासह सातपुडालगत अनेक शेतकरी या पिकाला पसंती देत आहेत.

२०१८ मध्ये खानदेशात भुईमुगाचे क्षेत्र सुमारे १०० हेक्टर एवढेच होते. अधिक उत्पादन खर्च, पाण्याची कमतरता या समस्या होत्या. पण २०१९ पासून २०२२ पर्यंत चांगले पाऊसमान राहिले. भुईमुगाला पाणी अधिकचे लागते. काळ्या कसदार, मध्यम जमिनीत पीक जोमात येते, असे शेतकरी मानतात.

Groundnut Cultivation
Groundnut : कर्नाटकातील भुईमुगाला महाराष्ट्रात मागणी

खानदेशात सातपुडा पर्वतालगत अधिकची लागवड व्हायची. परंतु ही लागवड अलीकडे वाढली आहे. कारण सातपुडा पर्वतालगत कृत्रीम जलस्रोत बऱ्यापैकी आहेत. तसेच वाणही अनेक उपलब्ध झाले आहेत. कमी कालावधी, कमी पाण्यात येणारे वाणही आहेत. त्यांचा उपयोग करून शेतकरी भुईमुगाचे एकरी १७ ते १८ क्विंटल उत्पादन घेत आहेत.

२०१९ मध्ये सुमारे २५० हेक्टरवर लागवड झाली. यानंतर २०२० मध्ये कोविड असतानाही भुईमुगाला उठाव होता. या वर्षीदेखील सुमारे ४०० हेक्टरवर लागवड होती. २०२१ मध्ये लागवड सुमारे ५०० हेक्टरवर झाली होती. २०२२ मधील लागवड वाढून ती ७०० हेक्टरवर पोहोचली. तर यंदाची लागवड सुमारे एक ते दीड हजार हेक्टरवर पोहोचेल, असा अंदाज आहे.

नंदुरबार, धुळे व जळगावमधील लागवडसारखीच राहू शकते. नंदुरबारातील लागवड धुळ्याच्या तुलनेत अधिक राहील. तेथे अनेक शेतकरी गुजरातमधील बियाण्याचा उपयोग करीत आहेत. जळगावात चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, चाळीसगाव, भडगाव, धुळ्यात शिरपूर, साक्री, नंदुरबारात तळोदा, शहादा व नवापूर तालुक्यांत लागवड बऱ्यापैकी होत आहे.

आमच्या भागातील भुईमूग लागवड मागील तीन वर्षांत हळूहळू वाढली आहे. पूर्वी कमी पाऊसमान होते. त्यामुळे लागवड कमालीची घटली होती. परंतु अलीकडे लागवड वाढत आहे.

- अनिल पाटील, शेतकरी, चोपडा, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com