Groundnut Cultivation : रब्बी भुईमूग लागवड तंत्र

भुईमूग लागवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याविषयी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.
Groundnut Cultivation
Groundnut CultivationAgrowon
Published on
Updated on

भुईमूग उत्पादन (Groundnut Cultivation) वाढीसाठी गादी वाफ्याचा वापर करून त्यावर प्लॅस्टिक आच्छादन तंत्राचा वापर करावा. कोकण विभागात भुईमूगाची उशिरा रब्बी लागवड १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरच्या दरम्यान करावी. भुईमूग लागवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याविषयी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया. 

Groundnut Cultivation
Groundnut production : उत्पादनवाढीसाठी भुईमूगाची कोणती जात योग्य ठरेल

रब्बी भुईमुगाची लागवड पारदर्शक प्लॅस्टिक आच्छादन पाच ते सहा मायक्रॉन पद्धतीने करण्यासाठी जमीन वाफसा स्थितीत आल्यावर जमिनीची नांगरट करून जमिन समपातळीत आणावी. त्यानंतर प्रतिगुंठा १०० ते १५० किलो चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळावे. 

५ ते ७ सेंमी उंचीचे व ६० सेंमी रुंदीचे आच्छादनासाठी गादीवाफे तयार करावेत. दोन गादीवाफ्यांमधील अंतर ३० सेंमी ठेवावे. 

ठिबक सिंचन वापरावयाचे असल्यास आच्छादन अंथरण्यापूर्वी ठिबक सिंचनाचा संच वाफ्यावर पसरून घ्यावा. 

Groundnut Cultivation
Groundnut Cultivation : भुईमुगाच्या शेंगांची ही खासियत ठाऊक आहे का?

प्रतिगुंठा १ किलो युरिया, ६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १ किलो म्युरेट ऑफ पोटॅश खताची मात्रा मातीमध्ये मिसळून द्यावी. 

आच्छादन अंथरण्यापूर्वी तणांच्या नियंत्रणासाठी ओल्या पृष्ठभागावर ब्युटाक्लोर तणनाशक ५० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात पेरणीपूर्वी पावसाची उघडीप असताना एकसारखी फवारणी करावी. 

तणनाशक फवारणीनंतर प्लॅस्टिक आच्छादन गादी वाफ्यावर अंथरावे व कडांवर मातीचा थर द्यावा. 

आच्छादनाच्या मध्यभागी आणि २० सेंमी अंतर ठेवून दोन्ही बाजूला अशा एकूण ३ ओळींमध्ये ३ सेंमी व्यासाची रुंदीच्या दिशेने सरळ रेषेत छिद्र पाडावीत आणि त्यानंतर लांबीच्या दिशेने १० सेमी अंतरावर सरळ रेषेत ३ सेंमी व्यासाची छिद्रे पाडावीत. 

कोकणात लागवडीसाठी सुधारित उपट्या जातींचा वापर करावा.  लागवडीसाठी कोकण गौरव, ट्रॉबे कोकण टपोरा, टी.ए.जी.२४, कोकण भूरत्न, टी.जी.२६, टी.जी.३७ ए, टी.पी.जी.४१ या जातींची निवड करावी.

अच्छादनावर पाडलेल्या छिद्रात ३ ते ४ सेंमी खोलीवर बियाण्याची पेरणी करावी. 

मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पेरणीपूर्वी बियाण्याला ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात चोळावे. यानंतर २० ग्रॅम रायझोबीयम आणि ५० ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकाची प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com