PM Kisan
PM Kisan Agrowon

PM Kisan : पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्राचे मिरज येथे उद्‍घाटन

तंत्रशुद्ध शेती करण्यासाठी पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्राचे अत्यंत मोलाचे व्यासपीठ सिद्ध होणार आहे, असे मत जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

सांगली : इफ्को संस्थेने जिल्ह्यात सर्वप्रथम पंतप्रधान कृषी समृद्धी (PM Krushi Samruddhi Center) केंद्राचे सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध शेती करण्यासाठी पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्राचे अत्यंत मोलाचे व्यासपीठ सिद्ध होणार आहे, असे मत जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी प्रकाश सूर्यवंशी (Prakash Surywanshi) यांनी व्यक्त केले.

PM Kisan
PM Kisan : ‘पीएम किसान’च्या कामाला प्राधान्य द्यावे : श्रीवास्तव

मिरज येथे इंडियन फार्मर्स फर्टीलायझर को-ऑपरेटिव्ह (इफ्को) व मिरज ग्रुप वि.का.स. सेवा सोसायटी यांच्या वतीने पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्राचे उद्‍घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विनायक पवार, ‘इफ्को’चे राज्य विपणन व्यवस्थापक उदय तिजारे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम,

गोदावरी फर्टीलायझरचे संचालक संजय निल्लावार, ‘इफ्को’चे संग्राम पाटील, जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील, अविनाश कदम, आकाश खोत, ‘इफ्को’चे राज्य विपणन व्यवस्थापक श्री. उदय तिजारे, मिरज ग्रुप वि.का.स. सोसायटीचे पदाधिकारी व संचालक उपस्थित होते. विजय बुणगे यांनी प्रास्ताविक केले. आभार ‘इफ्को’चे क्षेत्र अधिकारी रणजीत देसाई यांनी मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com