Rabi Sowing : सांगोला तालुक्यात रब्बीच्या पेरण्यांना सुरवात

तालुक्यात ५६ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी जमिनीतील पेरणीयोग्य वापसा पाहून व बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on: 
Updated on: 

सांगोला, जि. सोलापूर : सांगोला तालुक्यामध्ये रब्बी पिकाच्या (Rabbi Crop) पेरणीस (Rabi Sowing) सुरवात झाली असुन, यावर्षी तालुक्यात ५६ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी जमिनीतील पेरणीयोग्य वापसा पाहून व बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने (Agricultural Department) केले आहे.

Rabi Sowing
Crop Damage : शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी काढणीपश्चात तंत्रज्ञानावर लक्ष द्या

सांगोला तालुक्याचे सरासरी रब्बी पेरणीचे ४६ हजार ९५ हेक्टर क्षेत्र आहे. सध्या तालुक्यात अंदाजे २ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तालुक्यात ज्वारी, गहू, मका, हरभरा या प्रमुख पिकांची पेरणी केली जाते.

Rabi Sowing
Crop Protection : सूत्रकृमी ओळख, नुकसान अन् उपाययोजना

गतवर्षी रब्बी हंगामामध्ये ४८ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यावर्षी रब्बी हंगामामध्ये ५६ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये ज्वारी ४० हजार हेक्टर, मका ८ हजार ५०० हेक्टर, गहू ३ हजार हेक्टर, हरभरा ३ हजार ६०० हेक्टर, करडई २५० हेक्टर,

Rabi Sowing
Jute Crop : ताग पीक जोमात

सूर्यफूल २५० हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४६८.३ मिमी असून, आतापर्यंत ३२१ मिमी म्हणजे ६८ टक्के पर्जन्यमान झाले आहे. पण जमिनीचा पुरेसा वाफसा पाहून आणि बीजप्रक्रिया करूनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी,

असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कृषी विभागातर्फे रब्बी पिकांच्या पेरणीसाठी सर्व नियोजन करण्यात आले आहे. रब्बी पेरणीसाठी पुरेसे बियाणे व खते बाजारपेठेत उपलब्ध आहेत. तरीही बियाणे, खते व इतर गोष्टींबाबत काही अडचणी आल्यास कृषी विभागाशी संपर्क करावा.

-शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी, सांगोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.