Agriculture Department : वाशीममध्ये प्रभारी पाहताहेत ‘कृषी’चा कारभार

जिल्ह्याच्या कृषी विभागात रिक्त असलेल्या पदांमुळे कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेताना वरिष्ठांची ओढाताण सुरू आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

वाशीम ः जिल्ह्याच्या कृषी विभागात (Agriculture Department) रिक्त असलेल्या पदांमुळे (Vacant Post) कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेताना वरिष्ठांची ओढाताण सुरू आहे. जिल्ह्यात विविध संवर्गाची सुमारे १५० पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत.

वाशीम जिल्हा देशातील आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत आहे. त्यामुळे या जिल्ह्याकडे केंद्राचे विशेष लक्ष असते. योजनांचा निधी अधिक देऊन वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले जात आहे.

असे असताना प्रमुख विभाग असलेल्या कृषी खात्यात रिक्त पदांमुळे मोठ्या अडचणी तयार होत आहेत.

Agriculture Department
Agriculture Drone Loan : १५० ड्रोनसाठी मंजूरी; कुणाला मिळणार ड्रोनसाठी कर्ज ?

वाशीम जिल्ह्यात सध्या १५९ पदे रिक्त आहेत. यात उपविभागीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. सहापैकी तीन तालुक्यांना पूर्णवेळ तालुका कृषी अधिकारी नाहीत. या रिक्त पदांचा कारभार मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे सोपवून चालवला जात आहे.

यासोबत तंत्र अधिकाऱ्यांची तीन, कृषी अधिकाऱ्यांची तीन, प्रशासन अधिकारी एक, कृषी सहायकांची २३, सहायक अधीक्षक एक, लघू टंकलेखक एक, वरिष्ठ लिपिक आठ, लिपिक चार, आरेखक एक, अनुरेखक ३१, वाहनचालक आठ, शिपाई २६, चौकीदार ८, रोप मळा मदतनीस १८, तसेच मजूर श्रेणी एकमधील १८ पदे रिक्त आहेत.

रिक्त पदांमुळे कृषी विभागाच्या कामकाजाचा खोळंबा निर्माण होत आहे. शिवाय योजनांच्या अमलबजावणीत अडथळे येत आहेत. रिक्त पदांबाबत सातत्याने वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात येतो.

रिक्त पदे पाहता योजना अंमलबजावणीवर परिणाम होऊ नये यासाठी कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कामकाज करून घेतले जात आहे.

Agriculture Department
Agriculture Department : कृषी आयुक्तांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

तालुका कृषी अधिकारीही मिळेनात

रिक्त पदांमध्ये तालुका कृषी अधिकारी दर्जाची प्रमुख पदे रिक्त असल्याचा सर्वाधिक फटका बसतो आहे. जिल्ह्यात सहा तालुके असून त्यापैकी तीन ठिकाणी पूर्णवेळ तालुका कृषी अधिकारी नाहीत. वरिष्ठ स्तरावरून या पदांसाठी अधिकारी पाठवले जात नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.

जिल्ह्यात एकूण मंजूर पदे ४७७

कार्यरत पदे ३१८

रिक्त पदे १५९

पदनिहाय रिक्त पदांचा आलेख

पद मंजूर रिक्त

उपविभागीय अधिकारी १ १

तंत्र अधिकारी ५ ३

ता. कृ. अधिकारी ६ ३

कृषी अधिकारी २६ ३

कृषी सहायक २०६ २३

एकूण मंजूर पदे ४७७ १५९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com