Team Agrowon
देशात राबवण्यात येणाऱ्या किसान पुष्पक योजने (Kisan Pushapak Scheme)अंतर्गत १५० ड्रोनसाठी युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) कर्ज देणार आहे.
'गरुड एरोस्पेस' (Garud AeroSpace) या स्टार्टअप कंपनीने युनियन बँक ऑफ इंडियाशी यासंदर्भात करार केला आहे.
या करारामध्ये किसान पुष्पक योजनेनुसार १५० गरुड कृषी किसान ड्रोनसाठी मंजूरी दिली आहे.
बँकेमार्फत शेतकऱ्यांना ड्रोनसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ड्रोनमुळे पिकांवर खते आणि किडनाशके फवारणी करता येते.
तसेच जमिनीचे सर्व प्रकारचे सर्व्हेक्षण ड्रोनच्या मदतीने केले जाते.