Sunil Chavan
Sunil ChavanAgrowon

Agriculture Department : कृषी आयुक्तांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

शेतकऱ्यांसाठी विविध विस्तार योजनांमध्ये उत्तम कामगिरी बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने केला.
Published on

पुणे ः शेतकऱ्यांसाठी विविध विस्तार योजनांमध्ये (Agriculture Expansion Scheme) उत्तम कामगिरी बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने (Republic Day) केला.

Sunil Chavan
Agriculture Department : पदोन्नतीच्या फाइलमधील पदे, बदली ठिकाणांमध्ये फेरफार?

आयुक्तांच्या उपस्थितीत पुण्याच्या कृषीभवन आवारात ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी कृषी संचालक (फलोत्पादन) कैलास मोते व दशरथ तांभाळे (आत्मा) तसेच सहसंचालक रफिक नाईकवाडी उपस्थित होते.

Sunil Chavan
Agriculture Department : तदर्थ कृषी पर्यवेक्षकांना नियमित करण्याचे आदेश द्यावेत

पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई), ऊस पाचट व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन योजना, फळबाग लागवड तसेच कार्यालयीन स्वच्छता व नियोजनात उत्तम कामगिरी बजावलेल्या १७ कर्मचाऱ्यांचा सत्कार आयुक्तांच्या हस्ते झाला.

तालुका कृषी अधिकारी भारत कदम (मुख्यालय माढा), तालुका कृषी अधिकारी पोपट नवले (अहमदनगर), तालुका कृषी अधिकारी भारत कदम (माढा), मारुती साळे (हवेली), मंडल कृषी अधिकारी भाऊसाहेब सोनवणे (घोडेगाव), बाळासाहेब कोकणे (भिगवण), देवीदास चौधरी (केतूर), कृषी अधिकारी विशाल माने (पुणे ),

कृषी पर्यवेक्षक किसान सांगळे (श्रीगोंदा), राजश्री नरवडे (बेल्हे), संजय करळे (वैराग, बार्शी), कृषी सहायक रहेना शेख (नान्नज दुमाल, संगमनेर), अविनाश बोराडे (कुरुल,मोहोळ), गणेश कदम (खोर,दौंड), वरिष्ठ लिपिक युनूस बेग (श्रीरामपूर), वैशाली विधुते (सोलापूर), संदीप सावळे (पुणे), लिपिक भरत खिलारे (बारामती).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com