Rain Damage : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत

Heavy Rain Crop Damage : पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांनी हिम्मत न हरता जोमाने कामाला लागावे, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी आज केले.
Sanjay Bansode
Sanjay BansodeAgrowon
Published on
Updated on

Jalkot News : पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांनी हिम्मत न हरता जोमाने कामाला लागावे, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी आज केले.

अतनूर, रावणकोळा, मरसांगवी येथील अतिवृष्टी भागातील शेतीच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांना संवाद साधताना ते बोलत होते.

मंत्री बनसोडे यांनी अतनूर, रावणकोळा भागातील अतिवृष्टीमुळे खरोखर नुकसान झाले असून प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचा अहवाल तयार केला आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये दिले जात आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात ज्या सुविधा द्यायच्या आहेत, त्या सुविधा देण्यात येणार आहे.

Sanjay Bansode
Crop Damage : भिलेत दहा दिवस शेती पाण्याखाली

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असून शेतकऱ्यांनी न घाबरता जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर अतिवृष्टीमध्ये अतनूर, रावणकोळा भागातील रस्ते खरडून गेले असून त्याचे कामही तातडीने सुरु करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहे.

Sanjay Bansode
Paddy Crop Damage : सिंधुदुर्गात ३०० हेक्टरवरील भातपिकाला अतिवृष्टीचा फटका

अनेक ठिकाणचे पुले वाहून गेल्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांना अडचण निर्माण होऊन नये, यासाठी ते कमी वेळात ते काम पूर्ण करण्याच्या सूचना देऊन शेतकरी, महिला, नागरिक यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडविण्याचे प्रयत्न यावेळी मंत्री बनसोडे यांनी केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार सुरेखा स्वामी, गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, पोलिस निरीक्षक सुनील बिर्ले, काँग्रेसचे नेते मन्मथ किडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अर्जुन आगलावे, सभापती विठ्ठल चव्हाण, संग्राम हासुळे, रामराव राठोड, महताब बेग, अरविंद नागरगोजे, सत्यवान दळवे, सत्यवान पांडे पाटील, चंद्रशेखर पाटील, आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com