Sugarcane Harvesting : ऊसतोडीसाठी पैसे मागितल्यास थेट करा संपर्क

प्रादेशिक सरसंचालक मिलिंद भालेराव यांचे आवाहन
Complain if asked for money for cane
Complain if asked for money for caneAgrowon
Published on
Updated on



नगर ः ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यास मुकादम, कामगारांवर कारवाई केली जाणार आहे. ऊसतोडणीसाठी पैसे मागितले तर थेट संपर्क करा, त्यासाठी तक्रार निवारण अधिकारी नियुक्त केले असल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) मिलिंद भालेराव यांनी दिली.

Complain if asked for money for cane
ऊसतोडीसाठी पैसे मागितल्यास तक्रार करा : साखर आयुक्त गायकवाड

भालेराव म्हणाले, ‘‘गेल्यावर्षी ऊस जास्त होता. त्यामुळे ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या. या फायदा घेत ऊसतोड कामगार, मुकादम, वाहनचालकांनी ऊस उत्पादकांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे यंदाही अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रत्येक साखर कारखान्यासाठी एक तक्रार निवारण अधिकारी नियुक्त केला आहे. जर कोणत्याही शेतकऱ्यांना ऊसतोडणी करण्यासाठी पैसै मागितले तर तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे तक्रार करा, असे
भालेराव म्हणाले.

Complain if asked for money for cane
Sugarcane Harvesting : सॅटेलाइट मॅपिंग’द्वारे ऊसतोडणीचे नियोजन

तक्रार निवारण अधिकारी असे
कर्मवीर कुंडलिकराव जगताप (कुकडी, श्रीगोंदा) ः एस. बी. कुटाळ- ९५५२५२१०२१, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे (कोपरगाव) ः जी. बी. शिंदे -९३२६२६५८५०, मारुतराव घुले (भेंडा) ः सुरेश आहेर - ९६५७७२१४१०, अंबालिका (राशीन) ः विठ्ठल भोसले -९३०७३२२३१९, प्रसाद शुगर (वांबोरी) ः भरत काळे- ८००७०७८४१३, युटेक शुगर (संगमनेर) ः तांबे - ७७९८९६३४००, कर्मवीर शंकरराव काळे (कोळपेवाडी) ः व्ही. व्ही. कापसे - ८२०८४४२१३६, अशोक सहकारी (श्रीरामपूर) ः नारायण चौधरी - ८२०८८६७६५५, संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर (बोधेगाव) ः अभिमन्यू विखे - ९३७०९०११२७, क्रांती शुगर (देवीभोयरे) ः जाधव -७०२८०३८१८१, जयश्रीराम (हळगाव, जामखेड) ः पडवळ - ९९७०००८९२८, पद्मश्री विखे पाटील (राहाता) ः  एन. जी. चेचरे - ९४२०४९४९८१, गणेश सहकारी ः एस. एस. गमे - ९२८४६८९२८९, सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) ः सचिन बागल- ९८५४५०४९९९, मुळा सहकारी (सोनई)- व्ही. एच. फाटके - ९६५७०६०९४२, अगस्ती (अकोले) ः सयाजीराव पोखरकर - ९८८१६८४५५५, वृद्धेश्वर (पाथर्डी) ः के.एस. ढसाळ- ९४२३७५५२०४, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (संगमनेर) ः भाऊसाहेब खर्डे - ७५८८०७७३३, सोपानराव धसाळ (माळकूप, पारनेर) ः शिवाजी जंजिरे - ८८८८१६०००४, गंगामाई (शेवगाव) ः विठ्ठल शिंदे- ९५५२०००७९९, पियुष (नगर तालुका) ः एस.बी.मस्के - ९६२३०००७९९, साजन शुगर (देवदैठण, श्रीगोंदा) ः नवनाथ दरेकर - ९९२२६१९५०४, साईकृपा हिरडगाव ः विकास क्षीरसागर - ९५६१२१४५४६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com