Complain if asked for money for cane
Complain if asked for money for cane

ऊसतोडीसाठी पैसे मागितल्यास तक्रार करा : साखर आयुक्त गायकवाड

ऊसतोडणीसाठी पैशांची मागणी होत असल्यास ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी थेट साखर आयुक्तालयात तक्रार करावी, असे आवाहन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे.
Published on

पुणे ः ऊसतोडणीसाठी पैशांची मागणी होत असल्यास ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी थेट साखर आयुक्तालयात तक्रार करावी, असे आवाहन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे. 

आयुक्तांनी याबाबत एक परिपत्रकच जारी केले आहे. ‘ऊसतोडीसाठी मजूर व मुकादम विविध कारणे सांगतात. पीक चांगले नाही, ऊस खराब आहे, ऊस पडलेला आहे, क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही, अशी कारणे सांगून शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी करतात. पैसे न दिल्यास तोडणीस टाळाटाळ करतात. मजूर, मुकादम व वाहनचालकांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत’, असे या परिपत्रकात म्हटले आहे. 

चालू गाळप १५० दिवसांचे गाळप होईल इतकी साखर कारखान्यांची स्थापित गाळप क्षमता आहे. इथेनॉलकडेही साखर वळविली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळप होईल की नाही, अशी शंका घेऊ नये. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी सर्व कारखान्यांनी तक्रारी स्वीकारण्यासाठी मोबाईल, व्हॉटॲप क्रमांक जारी करावेत, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. 

प्राप्त तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधितांच्या  बिलातून रक्कम वसूल करावी व शेतकऱ्यास अदा करावी. ही जबाबदारी तक्रारनिवारण अधिकारीवर सोपवावी. चालू हंगामात तक्रार येणार नाही, याची दखल खासगी व सहकारी साखर कारखान्यांच्या प्रशासनाने घ्यावी, असेही आयुक्तांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

शेतकरी तक्रार कुठे करू शकतात? तक्रारनिवारण अधिकारी म्हणून कारखान्यांनी आता शेती अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. त्याचे संपर्क क्रमांक सर्व ग्रामपंचायत सूचना फलकावर प्रसिद्ध करावे. शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्याकडे लेखी द्यावी. तसेच, साखर आयुक्तालयाच्या shetkari.madat@gmail.com या ई-मेलचा वापर करावा. तक्रारीमध्ये मजूर, मुकादम, वाहतूकदाराचे नाव व वाहन क्रमांक नमूद करावा, असे साखर आयुक्तांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com