FPC Mahaparishad : ग्राहकांच्या गरजा ओळखा, मार्केटचा अभ्यास करा

शेतकरी उत्पादक कंपन्यांना चांगला भविष्यकाळ आहे. कंपनीचे व्यवस्थापन व्यावसायिक दृष्टीने जपण्यासह ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी काम करायला पाहिजे असा सूर ॲग्रोवनच्या एफपीसी महापरिषदेच्या चर्चासत्रात व्यक्त झाला.
Harshdeep Sing
Harshdeep SingAgrowon

पुणे : शेतकरी उत्पादक कंपन्यांना (Farmer Producer Company) चांगला भविष्यकाळ आहे. कंपनीचे व्यवस्थापन (FPC Management) व्यावसायिक दृष्टीने जपण्यासह ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी काम करायला पाहिजे असा सूर ॲग्रोवनच्या एफपीसी महापरिषदेच्या (Agrowon FPC Mahaparishad) चर्चासत्रात व्यक्त झाला. महापरिषदेत एकमेका साह्य करू- मार्केटिंगमधील संधी` या विषयावर चर्चासत्र झाले. त्यात पारादीप फॅास्फेट कंपनीचे ‘सीईओ’ हर्षदीप सिंग, ग्रीन ॲग्रीव्होल्युएशन कंपनीचे सहायक उपाध्यक्ष अनिरुद्ध देशमुख, कमोडिटी मार्केट तज्ज्ञ श्रीकांत कुवळेकर यांनी यात सहभाग घेतला.

Harshdeep Sing
FPC Mahaparishad : एफपीसींनो, धैर्याने लढा; विजय आपलाच

यावेळी बोलताना श्री. कुवळेकर म्हणाले की वायदे बाजार आणि आधुनिक ‘इलेक्ट्रॉनिक’ कृषिमाल लिलाव मंच तसेच ‘इलेक्ट्रॉनिक’ गोदाम पावती प्रणाली आदी पायाभूत सोयी या कृषिपणन व्यवस्थेचे भविष्य आहेत. त्यांचे शक्य तेवढ्या लवकर प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. वायदे बाजारासारख्या प्रगत जोखीम व्यवस्थापन मंचावरील व्यापार म्हणजेच ‘फ्युचर्स मार्केट’वर बंदी आणण्याचे काही हितसंबंधी व्यापारी संस्थांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था आणि शेतकरी नेत्यांनी पुढे येण्याची गरज आहे.

Harshdeep Sing
FPC Mahaparishad : अन्नदात्याने ऊर्जादाते व्हावे

हर्षदीप सिंग म्हणाले की ५० वर्षापासून आमची कंपनी शेतीक्षेत्रात कार्यरत आहे. पारादीप फॅास्फेटस आणि सहकंपनी झुआरी फार्महब या दोन कंपन्या आहेत. कंपनीची सुरवात गोव्यातून झाली असली, तरी महाराष्ट्रातच अधिक काम झाले आहे. व्यावसायिकतेबरोबरच शेतकऱ्यांना आवश्यक सोई-सुविधा देण्याला प्राधान्य दिले. विविध प्रशिक्षणासह माती परीक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सेवा त्यांच्यापर्यंत पोचवण्यात येत आहे.

महाराष्ट्र हे ऊस उत्पादनातील आघाडीचे राज्य आहे. वर्षाकाठी एक लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक उलाढाल त्यातून होते. या उत्पादनात आमच्या कंपनीची भूमिका मोठी आहे याचा आम्हाला अभिमान आहे. अनिरुद्ध देशमुख म्हणाले की परदेशात शेतकरी स्वतःच्या मालाची विक्री स्वतः करतात. स्वतःच आपल्या मालाची किंमत ठरवतात. आपल्याकडे मात्र बाजार समिती वा अन्य पर्याय वापरले जातात.

व्यापारी म्हणेल त्या किमतीत शेतमालाची विक्री होते. साहजिकच बाजाराची हमी नसते. यातून शेतीचा खर्च आणि नफा यांचा मेळ बसत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी कंपन्यांचे माध्यम प्रभावी ठरते आहे. शेतकरी कंपन्या शेतीतील खर्च कमी करतीलच, पण उत्पन्नही वाढवून देतील. त्यासाठी ग्राहक आणि शेतकरी अशा दोन्ही बाजूंनी विचार करून शेतकरी कंपन्यांनी व्यावसायिकता जपण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com