Fishery Market : मासळी बाजार समस्यांचे घर गैरसोईंमुळे विक्रेते, महाडकरांचे हाल;

महाड शहरात असलेल्या मासळी बाजाराची सद्यस्थितीत दुरवस्था झाली आहे. संपूर्ण बाजार परिसरात कचरा, दलदल, गवत आणि मासळीच्या दुर्गंधीचा विळखा बसला आहे.
Fishery Market
Fishery MarketAgrowon

महाड : महाड (Mahad) शहरात असलेल्या मासळी बाजाराची सद्यस्थितीत दुरवस्था झाली आहे. संपूर्ण बाजार परिसरात कचरा, दलदल, गवत आणि मासळीच्या दुर्गंधीचा विळखा बसला आहे. यामुळे मासळी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहक व विक्रेत्यांची (Fishery market) प्रचंड गैरसोय होत आहे.

Fishery Market
Tur Crop Management : तुर पिकाच्या चांगल्या वाढीसाठी कोणते उपाय कराल?| Agrowon | ॲग्रोवन

महाड शहरात नगरपालिकेने मासळी विक्रेत्यांसाठी १९८८ मध्ये स्वतंत्र इमारत उभी केली आहे. सावित्री नदीकाठी हे बाजार उभे आहे. यामुळे महाडकर आणि परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच जागी मासळी खरेदीची उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी मासळी खरेदीला कायम गर्दी असते.

Fishery Market
Crop Damage : नुकसानग्रस्तांना पीकविम्याचा लाभ द्या,

या इमारतीमध्ये २४ गाळे असले, तरी सध्या केवळ सहाच विक्रेते बसत आहेत. त्‍यांच्याकडून महिन्याला हजार, दीड हजार रुपये भाडेवसुली होते. असे असूनही इमारतीची दुरवस्था झाली आहे. बाजारात प्रवेश करण्यापूर्वीच नाकावर रूमाल ठेवून जावे लागते. प्रवेशद्वाराजवळच दलदल आणि घाण पसरलेली आहे. इमारतीच्या छपरावरील पत्रे फुटल्याने गळती होते.

पावसाचे पाणी पडत असल्याने विक्रेत्यांना आणि मासळी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना छत्री उघडून उभे राहावे लागते. बाजारात चालण्यासाठी बसवलेल्या लाद्या तुटल्या आहेत. विक्रेत्यांना बसण्यास आणि त्यांचा माल ठेवण्यास गोडाऊनची उत्तम व्यवस्था नाही.

स्वच्छता करण्यासाठी महाड नगरपालिकेकडे पाण्याची मागणी केली, तरी पुरवठा केला जात नाही, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मासळीचा कचरा जवळच टाकला जातो. स्वच्छता कर्मचारी आणि घंटागाडी फिरकत नसल्याने कचरा उचलला जात नाही. परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

मासळी बाजारात सोयीसुविधांसाठी विक्रेत्यांकडून मागणी केली जाते; परंतु पूर्तता झालेली नाही. अनेक महिलांचा

इमारतीला ठेंगा

महाड नगरपालिकेची मासळी बाजाराची इमारत असतानाही शहरात अनेक ठिकाणी मासळी विक्रेते बसत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई-गोवा महामार्गावर चांभारखिंड, नवेनगर, छ. शिवाजी चौक, दादली पूल, गाडी तळ, या ठिकाणी महिला मासळी विकण्यासाठी बसलेल्या असतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com