Pune Dams Water Storage : धरणांत चोवीस तासांत उच्चांकी ७.६९ टीएमसी पाण्याची आवक

Pune Dam Water Level Increase: जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील पश्चिम भागातील ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
Pune Dam
Pune DamAgrowon
Published on: 
Updated on: 

Pune News : जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील पश्चिम भागातील ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गुरुवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये उच्चांकी ७.६९ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. आत्तापर्यंतच्या दीड महिन्यातील काळातील ही सर्वाधिक वाढ असून, धरणसाठा ४४.३० टीएमसीपर्यंत पोहोचला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. धरणक्षेत्रात मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे मंगळवारी (ता.१८) धरणात २.६० टीएमसी आवक झाली.

बुधवारी (ता.१९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ५.१० टीएमसी पाण्याची आवक झाली असून, गुरुवारी (ता. २०) मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. मागील तीन दिवसांत घाटमाथ्यावर १०० ते ३३० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील धरणांत १५.३९ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

Pune Dam
Pune Dam Storage : पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची उघडीप

सध्या घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी पडत असल्या तरी काही वेळा पावसाचा जोर कमी होत आहे. त्यामुळे मागील चोवीस तासांमध्ये लोणावळ्याच्या घाटमाथ्यावर सर्वाधिक २७३ मिलिमीटर पाऊस पडला. तर मुळशीच्या घाटमाथ्यावर २३० मिलिमीटर, ठोकरवाडी २०९, वळवण २०१, कुंडली १५८, शिरोटा १५६ मिलिमीटर पाऊस पडला.

त्यामुळे मुळशी, आंध्रा, वळवण, शिरवटा, लोणावळा धरणांत २.९२ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत या तिन्ही धरणांत जोरदार पाऊस पडला. खडकवासला धरणांत हलका पाऊस पडला. त्यामुळे या भागातील धरणांत १.५९ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

Pune Dam
Pune Dam Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांत दोन दिवसांत ७.७० टीएमसी पाण्याची आवक

नीरा खोऱ्यातील पवना धरणक्षेत्रात सर्वाधिक १४३ मिलिमीटर पाऊस पडला असून, वडिवळे धरणक्षेत्रात १२३ मिलिमीटर पाऊस पडला. तर कासारसाई, कळमोडी, आंध्रा, गुंजवणी, नीरा देवघर या धरणक्षेत्रांत मुसळधार पाऊस पडला. तर भाटघर, चासकमान, भामा आसखेड धरणक्षेत्रात हलका ते मध्यम पाऊस पडला.

शेटफळ, नाझरे, वीर धरणक्षेत्रात हलका पाऊस पडला. त्यामुळे या भागातील धरणांत २.६८ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली. कुकडी खोऱ्यातील डिंभे धरणक्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, चिल्हेवाडी, घोड धरणक्षेत्रांत हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे या भागातील धरणांत १.३५ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. विसापूर, उजनी धरणक्षेत्रात पावसाची ढगाळ वातावरण असून पावसाने काहीशी उघडीप दिली होती.

गुरुवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये धरणनिहाय पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

पवना १४३, वडिवळे १२३, टेमघर १०५, वरसगाव ५५, पानशेत ५६, खडकवासला १६, कासारसाई ३९, कळमोडी ४७,चासकमान १२, भामा आसखेड २५, आंध्रा ५१, नाझरे ३, गुंजवणी ७२, भाटघर २८, नीरा देवघर ९५, वीर १०, पिंपळगाव जोगे २, माणिकडोह १२, येडगाव १३, वडज १७, डिंभे २७, चिल्हेवाडी ५, घोड १०,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.