Pune Dam Storage : पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची उघडीप

Pune Dam Level: धरणांत नव्याने एकूण २३.७२ टीएमसी पाणीसाठा
Pune Dam
Pune DamAgrowon
Published on: 
Updated on: 

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune Dam Level Update: पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावण आहे.

बुधवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंत टेमघर धरणक्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर घाटमाथ्यावर तुरळक सरी पडल्या असून, अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे.

सध्या जिल्ह्यातील बहुतांश भागात तुरळक सरी बरसत आहेत. त्यामुळे भात रोपवाटिकांना दिलासा मिळाला असला, तरी अनेक ठिकाणी भातरोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. तुरळक ठिकाणी भात लागवडीला प्रारंभ झाला असून, एसआरटी पद्धतीने लागवड केलेल्या भाताची रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. पूर्व भागात काही ठिकाणी पेरणीस सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यात ढगाळ वातावरण असले, तरी मुठा खोऱ्यातील टेमघर धरणक्षेत्रात २० मिलिमीटर पाऊस पडला. तर वरसगाव, पानशेत, खडकवासला धरणक्षेत्रात तुरळक पाऊस पडला. मुळशी धरणक्षेत्रात १२ मिलिमीटर, तर लोणावळा घाटमाथ्यावर १० मिलिमीटर, वळवण १३, कुंडली ६ मिलिमीटर पाऊस पाऊस पडला.

Pune Dam
Pune Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांत अवघा ३२ टीएमसी पाणीसाठा

तर ठोकरवाडी धरणक्षेत्रात पावसाने उघडीप दिली आहे. नीरा खोऱ्यातील नीरा देवघर दहा मिलिमीटर पाऊस पडला. पवना, कळमोडी, वडिवळे, आंध्रा, गुंजवणी धरणक्षेत्रांत तुरळक सरी बरसल्या. तर कासारसाई, चासकमान, भामा आसखेड, शेटफळ, नाझरे, भाटघर, वीर क्षेत्रांत ढगाळ वातावरण होते.

कुकडी धरण क्षेत्रात पावसाने तुरळक सरी पडल्या असून, येडगाव, वडज, घोड या धरणक्षेत्रात ढगाळ हवामान कायम होते. विसापूर, उजनी धरण क्षेत्रात अजूनही दमदार पाऊस पडला नसल्याने धरणात फारशी आवक झालेली नाही. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांत नव्याने एकूण २३.७२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

बुधवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नव्याने १.२२ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी बहुतांश धरणांत पाणीसाठा कमी असल्याने जोरदार ते मुसळधार पावसाची गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.