पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस सक्रिय झाला आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस पडला असून, काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. गुरुवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये लोणावळा येथे २१८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे खरिपातील पिके चांगलीच तरारली आहेत.
जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे भात पिकांना (Paddy) चांगलाच आधार मिळाला. अनेक ठिकाणी भात लागवडी उरकल्या आहेत. पूर्व भागात पावसाचा जोर कमी असला तरी दिवसभर पावसाची संततधार (Continuous rain) सुरू होती.
गुरुवारीही ढगाळ वातावरणाची स्थिती कायम होती. मात्र पश्चिम पट्ट्यात अधूनमधून सरी बरसत होत्या. त्यामुळे भात खाचरे पुन्हा एकदा तुडुंब भरली आहे. जोरदार पावसामुळे मागील काही दिवसांत कमी झालेला ओढ्या नाल्यातील पाण्याचा प्रवाह पुन्हा वाढला आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळीत (Water Storage) चांगलीच वाढ झाली आहे.
हवेली तालुक्यात पुणे वेधशाळा येथे २४, कोथरूड २०, भोसरी ३२, उरुळीकांचन २१, कळस २१ मिलिमीटर पाऊस पडला. तर खडकवासला, थेऊर, खेड, चिंचवड , हडपसर, वाघोली, केशवनगर भागात तुरळक सरी पडल्या.
मुळशीतील पौड ४५, घोटावडे ७०, थेरगाव ३१, मिलिमीटर भोरमधील भोलावडे ७४, भोर ४६, नसरापूर ३२, वेळू ३९, आंबवडे ५०, संगमनेर ३५, मावळमधील वडगाव मावळ २९, तळेगाव २२, खडकाळा ७४, शिवणे ८२ वेल्ह्यातील पाणशेत ९०, आंबवणे ९६ जुन्नरमधील राजूर ७५, जुन्नर २३, वडगाव आनंद २०, आपटाळे ५६ मिलिमीटर पाऊस पडला.
ओतूर, निमगाव सावा, बेल्हा, नारायणगाव, डिंगोरे भागात हलक्या सरी कोसळल्या. खेडमधील वाडा येथे ४६, राजगुरुनगर २५, कुडे ४७, पाईट ५०, चाकण २६, आळंदी २८, पिंपळगाव ३२, कन्हेरसर २२, कडूस ३४ आंबेगावमधील घोडेगाव ३९, आंबेगाव २७, कळंब २९, मंचर ३३ मिलिमीटर तर शिरूरमधील शिरूर शहरात २० मिलिमीटर पाऊस पडला.
टाकळी, वडगाव, न्हावरा, मलठण, तळेगाव, रांजणगाव, कोरेगाव, पाबळ हलका पाऊस पडला. बारामतीतील बारामती शहर ५२, माळेगाव ३६, पणदरे ३८, लोणी २६, उंडवडी ३६ मिलिमीटर तर सुपा, मोरगाव, वडगाव भागात तुरळक सरी बरसल्या.
इंदापूरताली भिगवण ४४, काटी २०, अंथुर्णी ४१, सणसर ४३, लोणी, बावडा, निमगाव येथे पावसाचा शिडकावा झाला. दौंडमधील देऊळगाव ३८, यवत ३८, कडेगाव २१, रावणगाव ३७, दौंड २२ मिलिमीटर, तर राहू, वरवंड, पाटस येथे तुरळक सरी बरसल्या. पुरंदरमधील भिवंडी येथे ३९ मिलिमीटर पाऊस पडला असून सासवड, कुंभारवळण, जेजुरी, परिंचे, राजेवाडी, वाल्हा येथे हलका पाऊस पडला.
येथे पडला मुसळधार पाऊस : काले ११०, कार्ला १८३, वेल्हा १४३, माले १२३, मुठे १६०, निगुडघर १२४, विंझर १२१,
गुरुवारी (ता. १०) तालुकानिहाय पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये :
तालुका --- पडलेला पाऊस
पुणे शहर -- १६.७५
हवेली -- १६.१०
मुळशी --- ७४.५०
भोर --- ५१.८८
मावळ --- १०२.५७
वेल्हा --- ११२.५०
जुन्नर --- २७.५६
खेड --- ३४.४४
आंबेगाव -- २८.००
शिरूर -- १४.६७
बारामती -- २७.००
इंदापूर -- २४.१३
दौंड --- २३.८८
पुरंदर -- १२.४३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.