Rain Update : पावसाचा धुमाकूळ सुरुच

राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय. मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक दिसतोय. या पावसामुळं सोयाबीन आणि कापूस पिकाचं नुकसान वाढलंय.
heavy rain
heavy rain Agrowon
Published on
Updated on

पुणेः राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rainfall) पडतोय. मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर (Rain Intensity) काहीसा अधिक दिसतोय. या पावसामुळं सोयाबीन आणि कापूस पिकाचं (Soybean Cotton Crop Damage) नुकसान वाढलंय. तर हवामान विभागानं ()weather Department) उद्या सकाळपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज (Heavy Rain Forecast) व्यक्त केलाय.

heavy rain
Monsoon Update : वायव्य भारतातून मॉन्सून परतला

विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त आहे. अकोला जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला. मंगळवारी पहाटेपासून काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी असलेल्या भागात पावसाचा जोर अधिक होता. नदी-नाल्यांना पूर वाहले.

पुराचे पाणी शेतांमधून वाहल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यासोबतच अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हरक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या.

heavy rain
Monsoon Update : मॉन्सूनच्या परतीस पोषक वातावरण

परतीच्या पावसाने मराठवाड्यातील अनेक भागात काढणीला आलेल्या पिकांची वाहतात होतेय. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाचही जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मंगळवारी तुरळक, हलका, मध्यम, दमदार ते जोरदार पाऊस झाला.

जालना जिल्ह्यातील दोन मंडळात अतिवृष्टी झाली. नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही पाऊस पडतोय. या पावसानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. काढणीला आलेलं सोयाबीन आणि कापूस हातचा जातोय.

कोल्हापूर जिल्ह्याच्या बहुतांशी भागात मंगळवारी पहाटेपासून जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं पिकांचं नुकसान होतंय. पहाटेपासूनच संततधार सुरू असल्याने खरीप पिकांच्या मळणीसह सर्व नियोजन फिस्कटले. सांगली जिल्ह्यातही पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली. अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाल्यानं ओढे, नदी, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. पावसामुळं काढणीला आलेलं सोयाबीन, उडीद, मका, लागवड केलेला कांद्याचं नुकसान होतंय. पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. तर जळगाव आणि धुळे जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या.

तर हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. त्यामुळं शेतकऱ्यांनी पीककाढणीचं नियोजन हवामानाचा अंदाज घेऊनच करणं फायदेशीर ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com