Monsoon Update
Monsoon Update Agrowon

Monsoon Update : मॉन्सूनच्या परतीस पोषक वातावरण

मॉन्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. यातच पावसाला पोषक हवामान असल्याने मराठवाडा, विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे.
Published on

मॉन्सूनचा परतीचा प्रवास (Monsoon Return Journey) पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. यातच पावसाला पोषक हवामान (Favorable Weather Condition For Rain) असल्याने मराठवाडा, विदर्भात पावसाने हजेरी (Rainfall) लावली आहे. आज (ता. ११) राज्यात ढगाळ हवामानासह (Cloudy Weather) हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज (Rain Forecast) हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे. तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यताही आहे.

Monsoon Update
Rain Update : खानदेशात पावसाचा धुमाकूळ

राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती हरियाणा आणि परिसराकडे सरकली आहे. उत्तर गुजरात पासून ईशान्य दक्षिण हरियाणा पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. तामिळनाडू आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून रायलसीमा, तेलंगणा, विदर्भ, पश्चिम मध्य प्रदेश ते ईशान्य राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

Monsoon Update
Rain Update : शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

वरील वातावरणीय स्थिती पोषक ठरल्याने मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात उन्हाचा चटकाही जाणवू लागला आहे. आज (ता. ११) राज्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

वायव्य भारतातून ३ ऑक्टोबर रोजी मॉन्सून परतला. त्यानंतर मात्र परतीच्या वाटचालीत मॉन्सूनची उत्तरकशी, नाझियाबाद, आग्रा, ग्वालियर, रतलाम, भारूच पर्यंतची सीमा सोमवारी (ता. १०) कायम होती. माघारीस पोषक वातावरण होत असल्याने चार ते पाच दिवसांत मध्य भारताच्या काही भागातून मॉन्सून काढता पाय घेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com