Pune News : राज्यात सर्वदूर पावसाला सुरूवात झाली आहे. कोकण, घाटमाथ्यासह विदर्भातही पावसाने जोर धरला आहे. मंगळवारी (ता. २७) विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. भंडाऱ्यातील साकोली येथे सर्वाधिक २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
भंडारा, गोंदियासह उर्वरित विदर्भातही मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. उत्तर कोकणातील रायगड, ठाणे पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.
घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. धरणांच्या पाणलोटातही पावसाची रिपरिप सुरू आहे. मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर काहीसा कमी आहे.
मंगळवारी (ता. २७) राज्यात ढगाळ हवामानासह पावसाच्या सरी सुरूच होत्या. नाशिक जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. सकाळी ११ वाजेनंतर अनेक भागात हलक्या सरी अधून-मधून होत होत्या. देवळा, कळवण तालुक्यांतील काही भागात पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. जळगाव, धुळे जिल्ह्यात दुपारी हलका पाऊस झाला.
मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातही अनेक भागात मंगळवारी हलका पाऊस झाला. परंतु पेरणीसाठी समाधानकारक पावसाची प्रतिक्षा आहे. परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ढगाळ वातावरण आहे. अधून-मधून रिमझिम पाऊस पडत आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे...
- विदर्भातही मध्यम ते जोरदार पाऊस
- उत्तर कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी
- रायगड, ठाणे पालघर जिल्ह्यात जोरदार सरी
- घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भागांत जोर
- धरणांच्या पाणलोटातही पावसाची रिपरिप
- मराठवाड्यात जोर काहीसा कमी; पेरण्यांसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा
मंगळवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांतील राज्यातील पाऊस (मिलिमीटर):
कोकण : पेण, माथेरान, भिवंडी प्रत्येकी १२०, वाडा, तलासरी प्रत्येकी १०, तलासरी, सांताक्रूझ प्रत्येकी ९०, पनवेल ८०, मुरबाड, खालापूर, वसई, ठाणे, डहाणू, उल्हासनगर प्रत्येकी ७०, कल्याण, माणगाव, उरण प्रत्येकी ६०.
मध्य महाराष्ट्र : लोणावळा ९०, महाबळेश्वर ६०, पेठ, वडगाव मावळ, चंदगड, पौड प्रत्येकी ३०, तळेगाव, राधानगरी, गगनबावडा, आंबेगाव, घोडेगाव, त्र्यंबकेश्वर प्रत्येकी २०.
मराठवाडा : निलंगा २०, जिंतूर, मानवत, हादगाव, कंधार, मुदखेड, छत्रपती संभाजीनगर, गंगाखेड प्रत्येकी १०.
विदर्भ : साकोली २००, भंडारा १६०, अर्जूनी मोरगाव, देवरी प्रत्येकी १५०, लाखणी, कोर्ची प्रत्येकी १४०, सालकेसा १३०, सडक अर्जूनी १२०, पवणी, आमगाव प्रत्येकी ११०, लाखंदूर १००.
घाटमाथा : खंद १२०, दावडी ११०, वाणगाव, अंबोणे, भिवापूर, ताम्हिणी प्रत्येकी ९०, लोणावळा, शिरगाव, शिरोटा, डुंगेरवाडी प्रत्येकी ८०.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.