Monsoon News : गेल्या २० दिवसांपासून शेतकऱ्यांसह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती, पण शहापूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून उकाड्याने हैराण झालेले नागरिकही आनंदी झाले आहेत.
दरम्यान, रविवारी सकाळपासूनच पावसाने रिपरिप सुरू केल्याने जनजीवन विस्कळित झाले असून ठिकठिकाणी पाणी साचल्याने डबके निर्माण झाले आहे; तर शेतकरी भात पेरणीच्या कामाला लागला असून शेतीच्या मशागतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांच्या कुटुंबाची लगबग सुरू झाली आहे.
शहापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आता ठिकठिकाणी शेतीच्या कामांनी वेग पकडला आहे. त्यानुसार शेतकरी भात पेरणीच्या कामाला लागला आहे. पेरणी कामे पूर्ण करण्यासाठी ट्रॅक्टरने व बैलाच्या साह्याने नांगरणी, कुळवण करून शेतामधील तणाने व्यापलेल्या जमिनीची वेचणी करण्याचे काम तालुक्यात ठिकठिकाणी सुरू केले आहे.
शहापूर तालुक्यातील सरासरी १५ हेक्टर जमिनीवर भाताची लागवड होत आहे. आधुनिक युगात नांगराची जागा ट्रॅक्टरने घेतली असून त्यामुळे शेतीची कामे लवकर आटोपता येतात, असे शेतकरी गजानन धसाडे यांनी सांगितले.
यामुळे आदिवासी बांधवांना आता शेतीची कामे मिळून त्यांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने ते समाधान व्यक्त करीत आहेत. काही शेतकरी वर्गाने अगोदरच बियाणे आणि खत खरेदी करून घरातच ठेवले होते, त्यामुळे त्यांनी कामाला सुरुवात केली आहे.
दरम्यान, रविवारी सकाळपासूनच पावसाने रिपरिप सुरूच असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डबके निर्माण झाले. पण दुसरीकडे शेतकरी भात पेरणीच्या कामाला लागला असून शेतीच्या मशागतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांच्या कुटूंबाची लगबग सुरू झाली आहे.
‘जादा दराने खत खरेदी नको’
जि.प. सेस फंडातून ५० टक्के अनुदानाने कर्जत -३ या वाणाचे भात बियाणे उपलब्ध असून त्याची विक्री पंचायत समिती शहापूर येथे सुरू आहे. कृषी केंद्रातही मुबलक बियाणे-खत साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी चढ्या भावात बियाणे खरेदी करू नयेत, असे आवाहन पंचायत समितीचे कृषी अधिकारी विलास झुंजारराव यांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.