Maharashtra Rain Update : कोकण, विदर्भात पावसाचा धुमाकूळ सुरूच

Maharashtra Rain Highlights : राज्यात तब्बल २०० हून अधिक मंडलांमध्ये शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. या पावसामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील काही नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने नद्यांनी धोक्याची पाणीपातळी ओलांडली आहे.
Rain Update
Rain Update Agrowon

Pune News : कोकण, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर व घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांत पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. राज्यात तब्बल २०० हून अधिक मंडलांमध्ये शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.

या पावसामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील काही नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने नद्यांनी धोक्याची पाणीपातळी ओलांडली आहे. धरणांतून विसर्ग सोडण्यात येत आहे.

नागपूरमधील कान्होलीबारा येथे सर्वाधिक २८५.५ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे.

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर कायम आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील अनेक मंडलांत अतिवृष्टी झाल्याने कोकणातील सर्वच नद्या ओसंडून वाहत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून, गुरुवारी (ता. २७) पहाटेपासून पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. संततधार पावसामुळे काही रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. कुडाळ येथील एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला. वादळीवाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. समुद्राच्या उधाणाचा किनारपट्टीच्या काही भागाला तडाखा बसला.

Rain Update
Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात २४ तासांत फक्त १ इंचाने पाणी वाढलं, राधानगरीचा एक दरवाजा बंद

जिल्ह्यातील सर्व नद्या इशारा पातळीनजीक पोहोचल्या आहेत. जिल्ह्यात बुधवारी (ता. २६) दिवसभर मुसळधार पाऊस सुरूच होता. पावसामुळे जिल्ह्यातील नदीनाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. रात्रभर सर्वत्र संततधार सुरूच होती. गुरुवारी सकाळपासून देखील मुसळधार पाऊस सुरूच असून, जिल्ह्याच्या काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.

कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत पावसाने जोर लावून धरला आहे. यामुळे कोल्हापूर पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. घाटमाथ्यावर जोर अधिक आहे. मुळशी घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू आहे.

गुरुवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत येथे सर्वाधिक १७७ मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा चांगलाच वाढत असून जिल्ह्यातील धरणासाठा ९६.३६ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. जिल्ह्यात दोन धरणे भरली असून, कासारसाई हे तिसरे धरण ८७ टक्के भरले आहे. इतर काही धरणांत पाणीसाठा ७०-८० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

नांदेड जिल्ह्यात संततधार पाऊस पडत आहे. रात्रीपासून अनेक भागांत भीज पाऊस सुरू आहे. किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. देगलूर ते उदगीर रस्ता पावसामुळे बंद इतग्याळ येथील पुलावरून पाणी जात आहे. परभणी, हिंगोली जिल्ह्यांत अधूनमधून रिमझिम पाऊस सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, उस्मानाबादमध्ये ढगाळ वातावरण असून पाऊस नाही.

Rain Update
Konkan Rain : कोकणात मुसळधार पाऊस सुरूच

नागपूर, यवतमाळमधील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, नऊ तासांत तब्बल १२१ मिलिमीटर पाऊस पडला. शहरात मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास विजांचे भयानक तांडव केले होते. अनेक ठिकाणी विजा पडल्याची व वीजपुरवठा खंडित झाली होती. इतर भागांत तुरळक सरी पडत असून, अनेक ठिकाणी पावसाची उघडीप आहे.

राज्यात मंडळनिहाय पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये : (स्रोत ः कृषी विभाग)

कोकण : अलिबाग १८७, पोयनाड १९२.८, किहिम १८७, सरल १८७, चरी १८७, चौल १९२.८, रामराज १९२.८, पनवेल ११२.५, ओवळे ११२.५, कर्नाळा ११२, चौक १००.८, वावोशी १९८.५, खोपोली १००.८, उरण १४४.३, कोपर्ली १५५.३, जसाई १५५.३, पाली ११५.३, आटोने १४०.८, जांभूळपाडा १३८, पेण २३९.३, हमरापूर १६८.३, वाशी १६८.३, कसू १९२.८, कामर्ली १९८.५, महाड १६०.८, बिरवडी ९७.८, करंजवाडी १४२.५, नाटे १६०.८, खरवली १४३.३, तुडील १६०.८, माणगाव ११८.८, इंदापूर १०४.८, गोरेगाव १६८.३, लोणेरे १७१, निजामपूर १३१.३, रोहा १५२, नागोठणे १५२, चनेरा १४३.८, कोलाड १४२.५, पोलादपूर १३०.५, कोंडवी १४२.५, वाकण १३२.८, मुरुड २३१, नांदगाव १८५.५, बोर्ली १९२.८, श्रीवर्धन, वळवती १३९, बोर्लीपंचतन १४८.८, खामगाव,

म्हसळा १६९.५, तळा १५०.८, मेंढा १४२.५, चिपळूण १२७.५, खेर्डी ११२.३, मार्गताम्हाणे १४४.८, रामपूर १४२.५, वहाळ १२५.८, सावर्डे १३५, असुर्डे १३४.५, कळकवणे, शिरगाव १३४, दापोली १४६.५, बुरोंडी १६०.३,

दाभोळ १५०.३, आंजर्ला १४६.५, वेलवी १४६.५, दापोली १३२.४, शिरशी १०३.५, आंबवली १३३.५, कुळवंडी १३४.३, भरणे १३१, दाभीळ १०३.५, धामनंद ११२.३, गुहागर १४६, तळवली १४७, पटपन्हाळे १४७, आंबलोली १२५.८, हेदवी १५०.३, मंडणगड १४९, म्हाप्रल १५०.५, देव्हरे १५३.५, रत्नागिरी १४८, खेडशी २३२.५, पावस १३१.५, जयगड १४५,

फनसोप १४८, कोतवडे १९१.३, मालगुंड १९१.८, टरवल १९३.३, पाली २१२, कडवई १५८.५, मुरडव १०६.८, माखजन १५०.८, फुंगस १८९.५,फणसवणे १४२.५, आंगवली १३९, कोंडगाव १८३.३, देवळे १६२.५, देवरूख १४०.८, तुळसणी १७३.३, माभळे २०२.३, तेर्हे १४२.५, राजापूर ११०.५, सौंदल १४७.५, कोंडेय १३८.५, जैतापूर ९४, कुंभवडे १३३.५, नाटे १०३, ओनी ९५.८,

पाचल १२२, लांजा २०५.५, भांबेड १८१.८, पुनस २०५.५, साटवली १०३, विलवडे १९२.३, पाटगाव ११३.५, सावंतवाडी, बांदा ११६, कणकवली १२०.३, फोंडा १२७.३, नांदगाव १००.३, तळेरे १२६, वागडे १२०.३, कडवल १०५.५, वैभववाडी १६७.८, येडगाव १३४.३, भुईबावडा १६७.८

मध्य महाराष्ट्र : हर्सूल १०८.३, महाबळेश्‍वर १४१.८, आंबा १८३.३, गगनबावडा १६७.८.

मराठवाडा : बोधडी १२९.८, इस्लापूर, शिवानी, जलधरा १३५.३.

विदर्भ : कळंब १०४.३, पिंपळगाव, सावरगाव २०१.८, वनी १०४.३, भालर, पुनावत १०४.३, शिरपूर १०४.३, पहापळ १०८.५, धानोरा ९२.३, वडकी १२२, वायगाव ११७.८, तळेगाव १९१.३, सेलू १४६.५, हिंगणी १३५.५, केळझर १७१.८, आंदोरी ११३, गिरोली १३३.३, हिंगणघाट, वाघोली १७२.३, सावळीवाघ १४०, कानडगाव १३३.३, वडनेर १३६.३, पोहना १०२, अल्लीपूर १५८.८,

शिरसगाव १३६.३, समुद्रपूर १२३.८, जाम १५०.८, निंदोरी १४०, कोरा १३५.३, काढळी ११२, मंदगाव १७२.३, नागपूर, सीताबर्डी १५९.५, पार्डी १२८.८, खापारी २०२.५, बोरी २१७, हुदकेश्‍वर १२८.८, सोनगाव ११०.५, गोंधनी १०२.८, कामठी १३३.३, दिघोरी १२८.८, हिंगाना १८६.३,

वानादोगिरी १७६, आदेगाव ११३.३, गुमगाव १६८.८, ताकलघाट २२७.३, माकरढोकडा १५०.८, बेला १२७, हेवंती १५०.८, पाचगाव १५८.५, कुही १२२.५, मांढळ, पाचेखडी १०५, तितूर १२८.८, वरोरा १०९.८, मांढेली १३०.५, तेमुर्डा १६२.५, खंबाडा १९१.५, चिखनी १४७, कोपर्णा १२७.५, पाटण १०३, ब्राम्हणी १०६.३, आसरली १७०, जिमलगत्ता १४५, धानोरा, चातगाव १०६.३.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com