अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : कोकणात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांत मुसळधार पावसाने नदी-नाले तुडुंब वाहत आहेत. काही नद्यांना पूर आल्याने काही गावांना धोक्याचा इशारा देण्यात आल्याने जनजीवन काही प्रमाणात कोलमडले आहे. तानसा, खडकवासला, कळमोडी, विहार, तुळशी, धामणी, चासकमान, भंडारदरा, धोम बलकवडी, राधानगरी ही धरणे जवळपास भरली आहेत. त्यातून नद्यांना पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा खेड, चिपळूण, महाड ही तीन शहरे पुराच्या उंबरठ्यावर आहेत. खेड आणि चिपळूण येथे पुराचे पाणी शिरण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. खेडच्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोकणातील अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत. खेड शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. खेड-दापोली मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. रत्नागिरी-संगमेश्वर-खेड-चिपळूण आणि दापोली तालुक्यांत पावसाची संततधार सुरू आहे.
अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. किनारी भागातील शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. पूर ओसरला नाही, तर भातशेतीचे नुकसान होण्याची भीती वर्तविली जात आहे. सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. संततधारेमुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गेले दोन दिवस मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू होत्या. मंगळवारी (ता. २५) दिवसभर जिल्ह्याच्या सर्व भागांत सरीवर सरी कोसळत होत्या. अनेक भागांत वादळीवाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळण्याचे प्रकारदेखील झाले. त्यानंतर रात्री पावसाने चांगलेच झोडपून काढले
मध्य महाराष्ट्रातही पुणे, कोल्हापूर, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. विशेषतः या पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे धरणांतील पाणी साठा वेगाने वाढत आहे. आतापर्यंत खडकवासला आणि कळमोडी अशी दोन भरली असून, त्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तर १७ धरणांत ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे वारणा धरणातून बुधवारी (ता. २६) वक्रद्वारामधून १५४५ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आल्याने नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा धरण व्यवस्थापन विभागाने दिला. शिराळा तालुका वगळता उर्वरित जिल्ह्यात पावसाने बुधवारी उसंत घेतली. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने चांगलीच दाणादाण उडवली आहे.
मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. अनेक ठिकाणी पावसाची उघडिप दिली आहे. या भागातील नद्या आणि ओढ्याच्या पाणीपातळीत घट झाली आहे. शेतीकामांना पुन्हा सुरुवात झाल्याने शेताशेतात शेतकरी दिसू लागली आहे. नांदेड, धाराशिव जिल्ह्यांतील काही ठिकाणी अजूनही शेतात पाणी साचल्याने पिके उन्मळून जाऊ लागली आहे.
धरणांतून पाण्याचा विसर्ग
मुसळधार झालेल्या पावसामुळे धरणांतील पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. सध्या नागपूर विभागातील गोसी खुर्द धरणांतून ५३८.२० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. तर निम्न वर्धा धरणांतून ७८.०५, ऊर्ध्व वर्धा १८४.४२, बेंबळा ८०, दारणा १०१.४९, भंडारदरा २०४.१३, हतनूर ९४१, खडकवासला ४८८४, कळमोडी १८८४, चासकमान ३००, वडीवळे २६९४, वीर १३३५, वडज १२९९, चिल्हेवाडी १७८६, घोम बलकवडी २२७६, धोम १५०, उरमोडी ४९०, तारळी ३४८७, कोयना १०५०, वारणा ९११, कासारी १०००, राधानगरी १४५० क्युसेकने नदीला विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर जगबुडी, शास्त्री, वाशिष्टी नद्यांना पूर आला आहे.
१०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडलेली ठिकाणे : (स्रोत - कृषी विभाग)
तुडली १६८.३, महाड १६८.३, महाबळेश्वर १४९, दहिसर, अप्पर, बेलापूर ११४.३, गोरेगाव ११५.८, कुंभार्ली ११४.३, बदलापूर ११५.८, पोयनाड, चौल, रामरज १०१.८, पनवेल १२२.५, पवयंजे १५६.५, ओवले, कर्नाळा १२२.५, तळोजे ११४.३, मोराबी १०५.३, नेरळ १८९.३, कडाव १३५.५, कळंब ११३.३, कशेळे १०६.८, आटोने १०१.३, कसू १०१.८, बिरवडी १०५.३, करंजवडी १३५.५, नाटे १६८.३, खारवली १२२.३, माणगाव ११०.३, इंदापूर ११४.५, गोरेगाव १३५, लोणेरे १४९.३, निजामपूर १०९.८, पोलादपूर, कोंडवी, वाकण १३५.५, म्हसळा ११६.३, खामगाव १२४.५, चिपळूण, खेर्डी १४१.८, रामपूर १०९.८, वहाळ १४३.५, असुर्डे १३४.८, कळकवणे, शिरगाव १४६.८, दापोली १५८.५, दाभोळ १०१.८, अंजर्ले १५८.५, वेळवी १५८.५, शिर्शी १३०.८, आंबवली ११७.८, कुळवंडी १४६.३, भरणे १६८.८, दाभोळ १३०.८, धामणंद १४१.८, गुहाघर ११८.५, आंबलोली १४३.५, मंडणगड १००.३, देव्हारे १०७.८, खेडशी १५०.५, बोरली १०१.८, कोतवडे १२८.५, मालगुंड १३५.५, टेरव १२९.८, पाली १४२.८, कडवई १०४.३, मुरडव ११०.८, आंगवली १०५.८, कोंडगाव १०६.३, देवळे १०२.३, सावंतवाडी ११०.८, कसा १०७.८, कडावल १०६.३, हेरे १०१.३, आंबा १०६.३, वेल्हा १०५, चंदगड १०१.३, चिखलदरा १३२.३.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.