Weather Update : काही ठिकाणी दमदार पाऊस

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Rain Update
Rain Update Agrowon

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१६) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. परंतु शुक्रवारी सकाळी आठ नंतर काही ठिकाणी मध्यम ते दमदार पाऊस झाला.(Heavy Rainfall) बहुतांश भागात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते.(Cloudy Weather)

Rain Update
Weather Update : कोणत्या भागांना पावसानं झोडपलं ?

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ४८ मंडळात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात तुरळक, हलका पाऊस झाला. सोयगाव तालुक्यासह पैठण तालुक्यातील बहुतांश मंडळात पावसाने उघडीप दिली होती. शुक्रवारी सकाळी आठ नंतर मात्र पैठण तालुक्यातील बऱ्याच भागात हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला.

Rain Update
Lumpy Skin : धुळ्यात जनावर खरेदी, विक्रीसह वाहतुकीवर प्रतिबंध

सिल्लोड तालुक्यातील अंभई परिसरात, चित्तेगाव, वैजापूर, लिंबेजळगाव, तुर्काबाद आदी ठिकाणीही पावसाची हजेरी लागली. जालना जिल्ह्यातील १५ मंडळात तुरळक, हलका पाऊस झाला. जालना, अंबड, परतूर, घनसावंगी आदी तालुक्यात पावसाचा टिपूसही बरसला नाही. शुक्रवारी सकाळनंतर मात्र शहागड परिसरात जोरदार पाऊस झाला. मंठा तालुक्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी झाल्या. तर कुंभार पिंपळगाव जाफराबाद परिसरात पावसाची हजेरी लागली. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात बीडकडे पावसाची पाठच राहिली.

परंतु सकाळी आठनंतर बीड जिल्ह्यातील गेवराई शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी मध्यम ते दमदार पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील केवळ दोन मंडळात तुरळक झालेला पाऊस वगळता जिल्ह्याकडे पावसाने पाठच फिरविली. उस्मानाबाद जिल्ह्यातील दहा मंडळात तुरळक पाऊस झाला. इतर ३२ मंडळात पावसाने पाठच फिरविली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com