Lumpy Skin : धुळ्यात जनावर खरेदी, विक्रीसह वाहतुकीवर प्रतिबंध

जनावरांमधील लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रादुर्भाव ग्रस्त क्षेत्रामध्ये व रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामधून पशुधनाची होणारी खरेदी- विक्री व प्रत्यक्ष वाहतूक प्रतिबंधित करण्याचे, आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.
lumpi skin disease in animal
lumpi skin disease in animalAgrowon
Published on
Updated on

धुळे : जनावरांमधील लम्पी स्कीन रोगाचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रादुर्भाव ग्रस्त क्षेत्रामध्ये व रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामधून पशुधनाची (Livestock Transport) होणारी खरेदी- विक्री व प्रत्यक्ष वाहतूक प्रतिबंधित करण्याचे, आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.

धुळे तालुक्यातील वडजाई, शिरुड, विंचूर, शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा, विखरण, पाटण, नेवाडे, सुराय, साक्री तालुक्यातील नवेनगर, अंबापूर, भाडणे येथे पशुधनामध्ये लम्पी स्कीन रोगाची लागण (lumpy Skin Infection) झाल्याचे रोग निदान अहवाल औंध (पुणे) येथील पशुसंवर्धन रोग अन्वेषण विभागाच्या सहआयुक्तांकडून प्राप्त झाले आहेत.

lumpi skin disease in animal
Lumpy Skin : जनावरांचा तातडीने विमा उतरवावा ः शेट्टी

त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे, की या गावांचे बाधित क्षेत्र व रोग प्रादुर्भावाच्या ठिकाणापासून पाच किलोमीटर त्रिज्येचा परिसर सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित करीत आहे. या परिसरातील गावांमध्ये बाधित जनावरे वगळता इतर जनावरांना प्रतिबंधक लसीकरण करावे. प्रादुर्भावग्रस्त या गावांपासून पाच किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात जनावरांचे बाजार, यात्रा, पशू प्रदर्शने आदी पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत आहेत.

lumpi skin disease in animal
Lumpy Skin : चंदगड तालुक्यात पशुवैद्यकांची वानवा

लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगर परिषदा व महापालिकांमार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरीक्षण करावे. तसेच बाधित पशुधनाची काळजी घ्यावी. जनावरांमधील लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था, प्रतिनिधी यांच्याविरुद्ध नियमानुसार गुन्हे दाखल करणे तसेच कार्यवाही प्रस्तावित करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील पशुधन विकास अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे.

...अशी घ्या ‘लम्पी’ आजाराची काळजी

साथीच्या काळात बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व चराईसाठी पशुपालकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी. रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये व रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामधून पशुधनाची होणारी खरेदी- विक्री व प्रत्यक्ष वाहतूक प्रतिबंधित करण्यात येत आहे. गायी व म्हशींना स्वतंत्र ठेवणे, बाधित व अबाधित जनावरे वेगळी बांधणे तसेच या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहांची शास्त्रीय पद्धतीने पशुपालकांनी विल्हेवाट लावावी. बाधित परिसरात स्वच्छता व निर्जंतुक द्रावणाची फवारणी करावी. रोग प्रसारास कारणीभूत डास, माश्या, गोचिड आदींच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करावी. लम्पी स्कीन रोगाचा विषाणू वीर्यामधून बाहेर पडत असल्यामुळे वीर्यमात्रा बनविणाऱ्या संस्थांमार्फत होणारे वीर्य संकलन थांबवावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com