Rain Update : तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस

गणेश विसर्जनानंतर पावसाने पुन्हा जोर धरण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत ढगाच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होत असून, तुरळक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस पडत आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : गणेश विसर्जनानंतर पावसाने पुन्हा जोर (Pune Rain Intensity) धरण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत ढगाच्या गडगडाटासह जोरदार (Heavy Rainfall) पाऊस होत असून, तुरळक ठिकाणी ढगफुटीसदृश्य (Rain Like Cloudburst) पाऊस पडत आहे. या पावसामुळे पुणे शहरातील ओढ्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर, काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. ग्रामीण भागात भात, कांदा, बाजरी, सोयाबीन, मूग, भुईमूग, मेथी, कोथिंबीर, वाटाणा, ऊस यांसह काही प्रमाणात फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Rain Update
Rain Update : विदर्भाला मुसळधारेने झोडपले

गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसाने पुरंदर, दौंड, शिरूर, खेड, जुन्नर, आंबेगाव, हवेली तालुक्यांत चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यामुळे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. सध्यादेखील काही ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचले असून, पाऊस सुरू असल्याने त्यात आणखी भर पडत आहे. पावसाने काही ठिकाणी चांगलेच थैमान घातल्याने बहुतांश तालुक्यांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेती, रस्ते, पूल, घरे यांचेही नुकसान झाले आहे.

Rain Update
Crop Damage : अठरा हजार अतिवृष्टिग्रस्तांना मिळणार ११ कोटींची मदत

सोमवारी (ता.१२) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये हवेलीतील थेऊर येथे सर्वाधिक ७६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर, अनेक ठिकाणी कमी-अधिक पाऊस पडला असून, चिंचवड परिसरात हलक्या सरी बरसल्या आहेत. जंगली महाराज रस्ता, आपटे रस्ता, सिंहगड रस्ता, फर्ग्युसन रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता अशा महत्त्वाच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडीचा सामना

नागरिकांना करावा लागला.

भोर तालुक्यातील किकवी, आंबवडे, संगमनेर, निगुडघर, भोर, मावळमधील तळेगाव, कार्ला, खडकाळा, लोणावळा, शिवणे, जुन्नरमधील नारायणगाव, जुन्नर, राजूर, डिंगोरे, आपटाळे, ओतूर, खेडमधील पाईट, आंबेगावमधील आंबेगाव शहर, शिरूरमधील टाकळी, वडगाव, न्हावरा, तळेगाव, शिरूर, कोरेगाव, बारामतीतील वडगाव, लोणी, बारामती, मोरगाव, उंडवडी, इंदापुरातील भिगवण, इंदापूर, लोणी, बावडा, काटी, निमगाव, दौंडमधील वरंवड, पुरंदर भिवंडी, परिंचे या मंडळांतही पावसाच्या हलक्या सरी पडल्या. ओढे, नाले भरून वाहिल्याने अनेकांच्या शेतात पाणी शिरले होते.

सोमवारी (ता.१२) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये झालेला मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

हवेली ः पुणे वेधशाळा ३८, केशवनगर ३८, कोथरूड ३०, खडकवासला ३७, उरुळीकांचन ४०, खेड २३, भोसरी १८, कळस ३४, हडपसर ३१, वाघोली ३६

मुळशी ः पौड ६७, घोटावडे ६२, थेरगाव, माले १८, मुठे १८, पिरंगुट ५८

भोर ः भोलावडे २४, नसरापूर २४, वेळू २३,

मावळ ः वडगाव मावळ २२, काले १९,

वेल्हा ः वेल्हा १५, पानशेत १६, विंझर ११, आंबवणे २३

जुन्नर ः वडगाव आनंद २१, निमगाव सावा ६०, बेल्हा ६०,

खेड ः वाडा २६, राजगुरुनगर १६, कुडे १६, चाकण १७, आळंदी १८, पिंपळगाव १४, कन्हेरसर ५०, कडुस १६

आंबेगाव ः घोडेगाव २५, कळंब ४२, पारगाव ३७, मंचर ४५

शिरूर ः मलठण २४, रांजणगाव ३२, पाबळ ५०,

बारामती ः माळेगाव १०, पणदरे १२, सुपा १९,

इंदापूर ः अंथुर्णी ३६, सणसर ३६

दौंड ः देऊळगाव १०, पाटस ४६, यवत १३, कडेगाव १३, राहू १४, रावणगाव १५, दौंड १७.

पुरंदर ः सासवड ३४, कुंभारवळण १९, जेजुरी ११, राजेवाडी १९, वाल्हा ११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com