Bajari Harvesting : बाजरीची कापणी, मळणी सुरू

Bajari Production : खानदेशात बाजरीची कापणी सुरू झाली आहे. यंदा हंगाम बरा आहे. पण उष्णता आणि मजूरटंचाईमुळे कामे रखडत सुरू आहेत.
Bajari Harvesting
Bajari HarvestingAgrowon

Jalgaon News : खानदेशात बाजरीची कापणी (Bajari Harvesting) सुरू झाली आहे. यंदा हंगाम बरा आहे. पण उष्णता आणि मजूरटंचाईमुळे (Labor Shortage) कामे रखडत सुरू आहेत.

खानदेशातील कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. यातच बाजरी, संकरित ज्वारी व मका कापणी, मळणी, अक्षय्यतृतीया एकाच वेळी आल्याने मजूरटंचाई वाढली आहे.

शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने कामे आवरून घ्यावी लागत आहेत. कारण मजुरीचे दरही वाढले आहेत. पीक मजुरी खर्चात परवडणार नाही, अशी स्थिती आहे. दुसरीकडे शेतकरी सकाळी सहा ते ११ यादरम्यान कामे उरकून घेण्याच्या लगबगीत आहेत.

Bajari Harvesting
Bajari Variety: पौष्टिक गुणधर्मांनी युक्त बाजरी वाणांचा होतोय प्रसार

खानदेशात बाजरीची पेरणी डिसेंबरअखेरिस व जानेवारीत झाली होती. काहींनी आगाप पेरणीदेखील केली होती. आगाप पेरणी केलेल्या बाजरीचे पीक कापणीवर आले आहे. अनेकांनी पपई, केळी लागवडीसंबंधी बेवड म्हणून लागवड केली होती.

यंदा खानदेशात मिळून सात हजार हेक्टरवर बाजरी पीक होते. तापी, अनेर, पांझऱा, गिरणा, बोरी नदीच्या क्षेत्रात पीक अधिक होते. धान्यासही प्रतिक्विंटल २४०० ते २६०० रुपये दर आहे. तसेच चाऱ्यासही प्रतिशेकडा तीन ते साडेतीन हजार रुपये दर आहे. परंतु हंगाम मजूरटंचाईने लांबत चालला आहे.

Bajari Harvesting
Bajari Processing Food : बाजरीपासून ब्रेड, पोहे, रबडी बनवणे शक्य; मधुमेहींसाठी ठरतेय हेल्दी फुड

अनेक शेतकऱ्यांची बाजरी वादळात आडवी झाली. ती बाजरी कापून कणसे खुडण्यासाठी अधिकचा वेळ व मजुरी द्यावी लागत आहे. त्यात काही कणसे जमिनीला लागल्याने त्यांचे नुकसानही झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बाजरी कापणी व मळणीचा हंगाम आणखी १५ ते २० दिवस सलग सुरू राहण्याची चिन्हे आहेत.

मजुरीत एक हजार रुपयांनी वाढ

दहा मे पूर्वी शेतात पूर्वमशागत व्हायला हवी. त्यात शेतकरी केळी, कापूस व इतर पिकांच्या लागवडीची तयारी करतील. बाजरी कापणी, कणसे खुडून ते एका ठिकाणी गोळा करण्यासाठी एकरी चार हजार रुपये मजुरी घेतली जात आहे.

यंदा ही मजुरी एक हजार रुपयांनी वाढली आहे. खानदेशात मार्चनंतर सातपुड्यातील मजूर बांधव, महिला दाखल होतात. पावसाळ्यापर्यंत ही मंडळी खानदेशात थांबून असते. त्यांचा चांगला आधार पिकांची कापणी, मळणी व इतर मजुरी कामांसाठी होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com