Diploma In Veterinary Science : डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स अभ्यासक्रमाला हिरवा कंदील

Veterinary Education : या अभ्यासक्रमास काहींनी आक्षेप घेत खोडा घालण्याचे काम केले होते. परिणामी यंदाच्या सत्रापासून या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार नाही, अशी स्थिती होती.
Animal Husbandry Department
Animal Husbandry DepartmentAgrowon
Published on: 
Updated on: 

Nagpur News : राज्यात प्रस्तावित इंग्रजी माध्यमाच्या पशुसंवर्धन विषयक पदविका अभ्यासक्रमाबाबत येत्या तीन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी (ता.२२) दिल्या.

Animal Husbandry Department
Diploma In Veterinary Science : ‘डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स’च्या अंमलबजावणीत राजकीय खोडा

या अभ्यासक्रमास काहींनी आक्षेप घेत खोडा घालण्याचे काम केले होते. परिणामी यंदाच्या सत्रापासून या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार नाही, अशी स्थिती होती. त्या संदर्भाने मंगळवारी (ता.२०) ‘ॲग्रोवन’मधून वृत्त प्रकाशित होताच पशुसंवर्धनमंत्र्यांनी गुरुवारी बैठक घेतली.

Animal Husbandry Department
Diploma In Veterinary Science : ‘डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स’वर तातडीची बैठक

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील या बैठकीला मंत्री विखे-पाटील, पशुसंवर्धन सचिव जे. पी. गुप्ता, आयुक्‍त डॉ. हेमंत वसेकर, पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुनील काटकर, डॉ. भगवान पाटील, डॉ. मारोती कानोलो, डॉ. संजय पाटील यांच्यासह ‘माफसू’चे कुलगुरू डॉ. शरद गडाख, संस्थाचालकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत येत्या तीन महिन्यांत हा अभ्यासक्रम सुरू करण्यासंबंधीची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून अभ्यासक्रम सुरु होण्याचा मार्ग सुकर झाल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com