Diploma In Veterinary Science : ‘डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स’च्या अंमलबजावणीत राजकीय खोडा

Veterinary Education : राज्यात बारावीनंतर तीन वर्ष कालावधीचा ‘डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स अभ्यासक्रम’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Animal Husbandry Department
Animal Husbandry DepartmentAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : राज्यात बारावीनंतर तीन वर्ष कालावधीचा ‘डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स अभ्यासक्रम’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदाच्या सत्रापासूनच या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे निश्‍चित झाले. ऐनवेळी या निर्णयाला ‘खो’ देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यातील काही लोकप्रतिनिधींचा या अभ्यासक्रमाला आक्षेप आहे. तसे पत्रच त्यांनी पशुसंवर्धनमंत्र्यांना दिल्याने ही प्रकिया रखडल्याची चर्चा आहे.

पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेत एप्रिलमध्ये या विषयावर मुंबईत बैठक झाली. त्यात डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स हा अभ्यासक्रम यंदाच्या सत्रापासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी आवश्‍यक अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडे देण्यात आली. ‘माफसू’च्या संचालक (शिक्षण) विभागाच्या निर्देशानुसार अभ्यासक्रम तयार करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.

Animal Husbandry Department
Akola Veterinary College : अखेर सहा वर्षांनंतर पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाचा मार्ग मोकळा

निर्धारित कालमर्यादेत हे काम पूर्ण करून शैक्षणिक परिषदेची मान्यता घेण्यात आली. त्यामुळे यंदाच्या सत्रापासूनच नव्या अभ्यासक्रमाला प्रवेश होतील, अशी स्थिती होती. मात्र अचानक नव्या अभ्यासक्रमाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वीप्रमाणेच दहावीच्या अर्हतेवरील पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

बारावीनंतर तीन वर्षांचा अभ्यासक्रम

दहावीनंतर सुरुवातीला एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम होता. त्यानंतर याचा कालावधी दोन वर्षांचा करण्यात आला. मेडिसिन, सर्जरी व इतर वैज्ञानिक बाबींचा अभ्यासक्रमात समावेश होता. २००६ मध्ये हे विषय वगळण्याचे काम झाले. पशुविज्ञानासंबंधी विषय वगळण्यात आले. या विरोधात पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनेने पाठपुरावा केला.

Animal Husbandry Department
Akola Veterinary College : अकोल्यातील नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयास मान्यता

परिणामी, २०१० मध्ये तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या कार्यकाळात डिप्लोमा अभ्यासक्रमात पशुसंवर्धनसह पशुविज्ञानाचा समावेश करावा, असे परिपत्रक काढण्यात आले. यासाठी नियुक्‍त एका समितीच्या अहवालावरून हे काम झाले. परंतु त्यातही खोडा घातला गेला.

२०२१ पासून पुन्हा अभ्यासक्रम बदलाच्या हालचालींना सुरुवात झाली. त्यासाठी ७ बैठका झाल्या. अखेरची बैठक पशुसंवर्धन मंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी जून २०२३ पासून होणार होती. या वेळी देखील या प्रक्रियेत खोडा घातला गेला, असे पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे सरचिटणीस डॉ. मारोती कानोले यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com