मलकापूर येथील केमिकल कंपनीला हरित लवाद न्यायालयाचा दणका

गेल्या २५ वर्षांपासून ही कंपनी कार्यरत असून कंपनीतून मागील १० वर्षांपासून निघणारे दूषित सांडपाणी खुल्या जागेत सोडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
Benzo Chemical
Benzo Chemical Agrowon
Published on
Updated on

बुलडाणा ः जिल्ह्यातील मलकापूर येथील दसरखेड एमआयडीसीमध्ये (Dasarkhed MIDC) असलेल्या बेन्झो केमिकल या कंपनीला (Benzo Chemical) हरित लवादाने (Green Arbitration) निकाल देत मोठा दंड ठोठावला आहे. गेल्या २५ वर्षांपासून ही कंपनी कार्यरत असून कंपनीतून मागील १० वर्षांपासून निघणारे दूषित सांडपाणी (Contaminated Sewage) खुल्या जागेत सोडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान (Loss To Farmers) होत आहे. सुमारे ३५० एकर शेती नापिक झाल्याचा दावा केला जात आहे.

Benzo Chemical
Pollution : कोंडलेला ‘श्‍वास’

विषारी सांडपाण्यामुळे अंदाजे १५० शेतकऱ्यांची जमीन प्रभावित झाली आहे. शेतातील विहिरी व बोअरमध्येसुद्धा या दूषित पाण्याचे अंश उतरल्यामुळे ते पाणी पिण्यासाठी व पिकांना देण्याच्या लायकीचे राहिलेले नाही. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांपासून तर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे व महाराष्ट्र शासनाकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या.

Benzo Chemical
Soybean Rate : सोयाबीन दर सुधारतील का?

परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळाला नव्हता. नाइलाज म्हणून शेवटी दसरखेड येथील अरविंद महाजन, निना थारकर, गोविंदराव डोसे, विनोद एकडे, उमेश नारखेडे व इतर ४५ शेतकऱ्यांनी मलकापूर येथील अॅड. साहेबराव मोरे यांच्यामार्फत पुणे येथील हरित लवाद न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या.

दरम्यान, कोरोनामुळे दोन वर्षे कोणतीही कारवाई झाली नव्हती. हरित लवाद न्यायालयात याचिकाकर्त्यांची बाजू अॅड. बीना परदेशी यांनी मांडली. हरित लवाद न्यायालयात प्रदूषण महामंडळाने पंचनामे करून घेतलेले पाण्याचे नमुने, त्याचे अहवाल याची तपासणी करून केमिकल कंपनीला कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये म्हणून नोटीस काढली होती.

हरित लवाद न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन २९ ऑगस्टला २०२२ निर्णय दिला. त्यामध्ये बेन्झो कंपनीने त्यांना मिळालेल्या परवान्याचे उल्लंघन केले व पर्यावरण कायद्याचे सुद्धा उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com