Bribe News : ३५ हजारांची लाच मागणारा ग्रामसेवक अटकेत

Arrest IN Bribe : सहा लाख रुपयांचे बिल काढून देण्यासाठी ग्रामसेवक अच्युतराव माणिकराव काकडे (वय ३८) याने ६ टक्के कमिशन स्वरूपात लाच मागितली होती.
Bribe
Bribe Agrowon
Published on
Updated on

Buldana News : जिल्ह्यातील खामगाव पंचायत समितीअंतर्गत पिंपरी धनगर येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाला ३५ हजार रुपयांची लाच घेताना बुलडाण्यात अटक करण्यात आली.

सहा लाख रुपयांचे बिल काढून देण्यासाठी ग्रामसेवक अच्युतराव माणिकराव काकडे (वय ३८) याने ६ टक्के कमिशन स्वरूपात लाच मागितली होती. बुलडाणा येथे चिखली मार्गावर हाजी मलंग दर्ग्यासमोर हा ग्रामसेवक लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकला.

ग्रामसेवक काकडे हा पिंप्री धनगर आणि जयरामगड ठिकाणी कार्यरत आहे. जयरामगड ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे वस्ती सुधार योजनेअंतर्गत काम झाले. यासाठी खामगाव तालुक्यातील चिंचपूर येथील एका पुरवठादाराने साहित्याचा पुरवठा केला आहे. त्याचे जवळपास ६ लाख रुपये झाले होते.

Bribe
Nashik Bribe News : लाचखोर अधिकारी खरेंच्या घरात अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे

हे बिल मिळण्यासाठी पुरवठादाराने ग्रामसेवकाकडे मागणी केली. परंतु या रकमेच्या ६ टक्के रक्कम म्हणजे ३६ हजार रुपये देशील तरच तुझे बिल काढतो, असे ग्रामसेवकाने सांगितले. लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित पुरवठादाराने लाचलुचपत विभाग गाठत तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर याची पडताळणी झाली.

Bribe
Akola Bribe News : मृत जनावरांच्या मोबदल्यासाठी ८ हजारांची मागितली लाच

नंतर सापळा रचण्यात आला. पुरवठादाराने लाचेच्या रकमेत तडजोड करून ३६ हजार ऐवजी ३५ हजार रुपये निश्चित केले. त्यानंतर सापळा लावण्यात आला. रक्कम स्वीकारताच काकडेला ताब्यात घेण्यात आले.

अमरावती परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलिस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनात पीआय सचिन इंगळे यांनी पोना, विनोद लोखंडे, जगदीश पवार, महंमद रिजवान, रवींद्र दळवी, पोका स्वाती वाणी, काँ. शैलेश सोनवणे, काँ. अरशद शेख या पथकाला घेऊन सदर सापळ्याची कार्यवाही यशस्वी केली. आरोपी ग्रामसेवक काकडे याला न्यायासमोर उपस्थित केले असता त्याला मंगळवार (ता.११)पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com