Nashik Bribe News : लाचखोर अधिकारी खरेंच्या घरात अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे

३० लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटकेत असलेले जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्या बँकेतील लॉकर्स तोडण्यात आली असता ती रिकामी आढळून आली.
Bribe
Bribe Agrowon
Published on
Updated on

Nashik News : ३० लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटकेत असलेले जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्या बँकेतील लॉकर्स तोडण्यात आली असता ती रिकामी आढळून आली.

त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आपला मोर्चा पुन्हा खरेंच्या निवासाकडे वळविला आणि पुन्हा झडतीसत्र राबविले. त्या वेळी घरातून त्यांच्या प्रचलित कार्यशैलीनुसार आक्षेपार्ह कागदपत्रे पथकाच्या हाती लागली आहेत. तसेच आणखी सहा नवीन बँक खात्यांची माहिती समोर आली आहे.

नाशिक जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना गेल्या सोमवारी (ता. १५) रात्री कॉलेज रोडवरील त्याच्या निवासस्थानी ३० लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.

न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, तिची मुदत संपली. गुरुवारी (ता. १८) खरे यांच्या एका सहकारी बँकेतील लॉकर्सची चावी नसल्याने तोडून उघडण्यात आले. दहा वर्षांपूर्वीपासूनचे ते लॉकर्स होते.

Bribe
Nashik Bribe News : नाशिकच्या जिल्हा उपनिबंधकांना ३० लाखांची लाच घेताना अटक

त्यातून तपासी पथकाच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे तपासी पथकाने पुन्हा खरे यांच्या राहत्या घराची झडती घेतली. दिवसभर सुरू असलेल्या या झडतीसत्रामध्ये तपासी पथकाच्या हाती आक्षेपार्ह कागदपत्रे लागलेली आहेत.

खरे यांच्या अटकेनंतर त्यांच्या कार्यशैली प्रणालीची खुलेआम चर्चा होऊ लागली आहे. त्यातीलच काही प्रकरणांशी संबंधित आक्षेपार्ह कागदपत्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

Bribe
Bribe News : ‘खरें’वरील कारवाईनंतर धक्कादायक बाबी समोर

खरे यांच्या दालनातही झडतीसत्र राबविण्यात आले. तेथील अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. तेथूनही काही आक्षेपार्ह कागदपत्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासी पथकाने ताब्यात घेतली आहेत. खरे यांच्या कारनाम्यांसंदर्भातील काही तक्रारीही ‘लाचलुचपत’कडे करण्यात येत आहेत.

आतापर्यंत शोधून काढली अकरा बँक खाती

खरेंना अटक केल्यापासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांची आतापर्यंत अकरा बँक खाती शोधून काढली. यातील ८ खात्यांतून ४३ लाखांची माया जप्त करण्यात आलेली आहे.

गुरुवारी (ता. १८) पुन्हा झडतीसत्र सुरू असताना आणखी सहा बँक खात्यांची माहिती समोर आली आहे. या बँक खात्यांसंदर्भात संबंधित बँकांची खाती सील करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com