Bhagatsingh Koshyari : नरसिंहरावांच्या पुतळा अनावरणाचे निमंत्रण राज्यपालांनी नाकारले ः चव्हाण

रामटेक येथील संस्कृत विद्यापीठ परिसरात उभारलेल्या माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे निमंत्रण राज्यपालांनी नाकारल्याची माहिती असून, हे अनुचित असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
BhagatSingh Koshyari
BhagatSingh KoshyariAgrowon
Published on
Updated on

नागपूर : रामटेक येथील संस्कृत विद्यापीठ (Sankrut University) परिसरात उभारलेल्या माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव (P. V. Narsimha Rao) यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे निमंत्रण राज्यपालांनी नाकारल्याची माहिती असून, हे अनुचित असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी म्हटले आहे.

BhagatSingh Koshyari
मातृभाषेविषयीचा अभिमान जागा करा ः राज्यपाल कोश्यारी

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. चव्हाण म्हणाले की, येत्या २१ डिसेंबर रोजी रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभाचे नियोजित आहे. याच वेळी विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या पी. व्ही. नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची विनंती विद्यापीठ प्रशासनाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केली होती.

BhagatSingh Koshyari
दुर्बलांचे दु:ख कमी करण्यासाठी राज्याचे व्यापक प्रयत्नः कोश्यारी

मात्र, त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले नसल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर राज्यपाल येण्यापूर्वीच या पुतळ्याचे अनावरण करून घ्या, असेही राज्यपाल कार्यालयाने कळविल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विद्यापीठाने राज्यपाल येण्याच्या अवघ्या एक दिवस आधी २० डिसेंबर रोजी या पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित केला आहे. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे काँग्रेसचे नेते असले तरी ते देशाचे पंतप्रधान होते. देशातील एक उत्तुंग व विद्वान नेते म्हणून त्यांची ओळख होती.

विशेष म्हणजे ते रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदारही राहिले होते. देशाची अर्थव्यवस्था नाजूक असताना त्यांच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पी. व्ही. नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्यपालांनी केले असते तर ते अधिक योग्य ठरले असते, असे सांगून २१ डिसेंबर रोजी कुलपती या नात्याने दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल विद्यापीठात येत असताना देशाच्या माजी पंतप्रधानांच्या पुतळ्याचे अनावरण आदल्या दिवशीच उरकून घेण्यामागे नेमके प्रयोजन तरी काय? असा प्रश्नही अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com